Ponniyin Selvan 2 : मणिरत्नम यांचा पोन्नियिन सेल्वन २ ‘या’ तारखेला होणार रिलीज | पुढारी

Ponniyin Selvan 2 : मणिरत्नम यांचा पोन्नियिन सेल्वन २ 'या' तारखेला होणार रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा बहुचर्चित पोन्नियिन सेल्वन भाग २ सध्या पोस्ट-प्रॉडक्शन सुरु असून, हा चित्रपट एप्रिल २०२३ मध्ये थिएटरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ३० सप्टेंबरला आलेला पोन्नियिन सेल्वन: भाग एक सुपरहीट ठरला. या चित्रपटाने  जगभरात साडेचारशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. अजूनही जगभरातील निवडक चित्रपटगृहांमध्ये त्याचे प्रदर्शन सुरू आहे. ( Ponniyin Selvan 2 )

कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या लोकप्रिय तमिळ कादंबरीवर पोनियिन सेल्वन आधारित आहे. पहिल्या भागाचा शेवट अतिशय रोमांचकारी झाला. आता सर्वांच्या नजरा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडे लागल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, पोन्नियिन सेल्वन: भाग २ एप्रिल २०२३ रोजी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दरम्याने थिएटरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या याचे पोस्ट-प्रॉडक्शन सुरु आहे. ( Ponniyin Selvan 2 )

चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले असून, या चियान विक्रम, त्रिशा, ऐश्वर्या राय-बच्चन, जयम रवी आणि कार्तीयांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रकाशराज, जयराम, विक्रम प्रभू , ऐश्वर्या लक्ष्मी, सरथकुमार शोभिता आणि धुलिपाला आदि सहाय्यक भूमिकेत आहेत.
(Ponniyin Selvan 2 )

हेही वाचा :  

 

Back to top button