Shiv Sena MLA Disqualification Case : अध्यक्षांच्या निर्णयाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

Nagpur News
Nagpur News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना आमदारांच्या अपात्रता (MLA Disqualification Case) याचिकांवरील तब्बल चार महिन्यांच्या कामकाजानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल जाहीर केला जाणार आहे. पात्र-अपात्रतेचा निकाल जाहीर होणार असल्याने अध्यक्षांच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. "पक्ष आम्ही आहोत, ठाकरे गटाच्या आमदारांना आमचा व्हीप आजही लागू होतो. विधानसभा अध्यक्षांनी बहुमताच्या आधारे निकाल आमच्या बाजूने दिला पाहिजे," असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. (Shiv Sena MLA Disqualification Case)

शिवसेना हा अधिकृत पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे दिला आहे. विधानसभेत आणि लोकसभेत आमचे बहुमत असल्यानेच आयोगाने निर्णय दिला. काही लोक मॅच फिक्सिंगचे आरोप करतात, पण विधानसभा अध्यक्ष अधिकृतपणे भेटीसाठी आले होते. रात्री लपून नाही तर दिवसा उजेडामध्ये आले होते. ते एक आमदार आहेत त्यांच्या मतदार संघाची काम होती. त्यावेळी अधिकृतपणे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यामुळे चोराच्या मनात चांदणे आहेत. विरोधी पक्षाचे लोक अध्यक्षांसोबत जेवत होते, आम्ही कधी आक्षेप घेतला नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपाला दिले. (Shiv Sena MLA Disqualification Case)

आमचे घटनाबाह्य सरकार नाही. सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे १६४ विरूद्ध ९९ असे बहुमत असल्याने सरकार बनल्याचे सांगितले आहे. ठाकरे गट घटनाबाह्य आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसत आहे. सरकार पडणार असे सांगण्यासाठी अनेक ज्योतिषी आले, पण सरकार काय पडले नाही. सरकार अधिक मजबूत झाले. आता बहुमताच्या आधारे अध्यक्षांनी निकाल आमच्या बाजून देणे अपेक्षित आहे, असा दावा शिंदे यांनी केला आहे. (Shiv Sena MLA Disqualification Case)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news