सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास प्रारंभ

सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ,www.pudhari.news
सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ,www.pudhari.news
नाशिक (सप्तशृंगीगड) : पुढारी वुत्तसेवा :
श्री. सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास आज श्री रामनवमीच्या दिवशी अतिशय उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. आज पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
सकाळची पंचामृत महापूजा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनिल बी. शुक्रे व नाशिकचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश अभय एस. वाघवसे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष तथा अति. सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, जिल्हा न्यायालय, नाशिक येथील राजशिष्टाचार अधिकारी नितिन आरोटे यांच्सासह भाविकभक्त  मोठ्या संख्येने उपस्थित होते. चोख सुरक्षा व्यवस्थेत देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे.
चैत्रौत्सव कालावधीत आलेल्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच दर्शनासाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्थेच्या परिसरात ३ ठिकाणी भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकाचूक होवू नये या दृष्टीने उदघोषणा कक्षाची स्थापना करण्यात  आली आहे. तसेच एकूण २६९ सी. सी. टी. व्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग देखील लक्ष ठेवून आहेत.
ऐन वेळेस उद्भवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था व आवश्यक ठिकाणी पाणपोया, चप्पल स्टँडची व्यवस्था करण्यात आलेली असून विश्वस्त संस्थेच्या परिसरात सर्वत्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ व विश्वस्त संस्थेचे एकूण ३ जनरेटरद्वारे अखंडित विद्युत पुरवठा ठेवण्यात येणार असून संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी ५० कर्मचा-यांची निवड करण्यात आली आहे.
दि. १० ते दि. १६ दरम्यान पूर्णतः खाजगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाविकांसाठी १०० एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. सप्तशृंगगडापासून एक किलो मीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. तसेच नांदुरी येथे मेळा बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी देवी संस्थान, पोलीस विभाग, आरोग विभाग, महसुल विभाग, ग्रामपंचायत, एस. टी. महामंडळ, आपत्ती व्यवस्थापन आदिसह प्रयत्नशील आहेत. 

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news