ओबीसी आरक्षण : केंद्राकडे असलेला इम्पिरिअल डाटा ९८ टक्के निर्दोष : छगन भूजबळ

छगन भुजबळ
छगन भुजबळ

नागपूर : पुढारी ऑनलाईन डेस्क

ओबीसींचा इम्पिरिअल डाटा (ओबीसी आरक्षण) असतानाही केंद्राने तो दिला नाही. भाजपकडून ओबीसींची कोंडी केली जातेय. केंद्राकडे असलेला इम्पिरिअल डाटा ९८ टक्के निर्दोष आहे. असे मंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे. (ओबीसी आरक्षण)

ओबीसींचा डेटा केंद्राने दिला नाही. केंद्राला डाटा द्यायचा नव्हता. असा आरोप करत छगन भूजबळ यांनी संताप व्यक्त केला. ओबीसींचा इम्पिरिअल डाटा असतानाही केंद्राने दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डाटा गोळा केला नाही, मग भाजप नेत्यांनी कसली मागणी केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्राकडे असलेला इम्पिरिअल डाटा ९८ टक्के निर्दोष आहे. भाजपकड़ून ओबीसी आरक्षणाला विरोध आहे. भाजपचे पदाधिकारी ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जातात. महाविकास आघाडी सरकारची, ओबीसींची भाजपकडून कोंडी केली जातेय. कोरोनामुळे २ वर्षात डेटा गोळा करता आला नाही. देशाची जणगणना झाली नाही. मग आमच्याकडून कसली अपेक्षा, असे मत भूजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news