Miss World 2021 : मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले रद्द, मानसा वाराणसी हिच्यासह १७ स्पर्धक कोरोना पॉझिटिव्ह | पुढारी

Miss World 2021 : मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले रद्द, मानसा वाराणसी हिच्यासह १७ स्पर्धक कोरोना पॉझिटिव्ह

पुढारी ऑनलाईन डेस्क

मिस वर्ल्ड Miss World ही सर्वांत जुनी सौंदर्य स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पण यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या स्पर्धेतील स्पर्धेक आणि अन्य कर्मचारी मिळून एकूण १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सोहळा प्यूर्टो रिको मध्ये या आठवड्यात होणार होता. पण कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मिस वर्ल्ड ऑर्गनायजेशन ही स्पर्धा पुढे ढकलली आहे. भारताची मानसा वाराणसी मिस वर्ल्ड २०२१ स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. तिचा चाचणी अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. सर्व कोरोना पॉझिटिव्ह स्पर्धंकांना आयसोलेट करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील स्पर्धक, कर्मचारी आणि अन्य लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करुन ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टर आणि प्यूर्टो रिकोच्या आरोग्य विभागाशी केलेल्या चर्चेनंतर या स्पर्धेचा अंतिम सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे मिस वर्ल्ड ऑर्गनायजेशनने म्हटले आहे.

Miss World र्गनायजेशनच्या सीईओ ज्युलिया मॉर्ली यांनी म्हटले आहे की, “स्पर्धक स्पर्धेत परत येण्याची आम्ही वाट पाहत आहोत, ते मिस वर्ल्डच्या मुकुटासाठी स्पर्धा करतील. प्यूर्टो रिको मधील वातावरण सुरक्षित आहे.”

भारताची मिस इंडिया वर्ल्ड २०२१ मानसा वाराणसी मिस वर्ल्ड स्पर्धा २०२१ साठी भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. मानसाचा जन्म हैदराबाद येथे झाला आहे. तिने मिस इंडिया स्पर्धेची विजेती आहे.

दरम्यान, नुकतीच मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली. यात भारताची हरनाज संधूने मिस युनिव्हर्सच्या मुकूटावर आपले नाव कोरले.

हे ही वाचा :

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss World (@missworld)

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

Back to top button