‘आम्ही समीर वानखेडेंना जात पडताळणी प्रमाणपत्र दिले नाही’

‘आम्ही समीर वानखेडेंना जात पडताळणी प्रमाणपत्र दिले नाही’

बारामती : पुढारी वृत्तसेवा

मुंबई एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावाने एकही जात पडताळणी प्रमाणपत्र दिले गेले नसल्याची माहिती मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे. बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी यासंबंधीची माहिती मागितली होती.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. वानखेडे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. या आरोपांमुळे राज्यात मोठा गदारोळ माजला होता.

बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मुंबई जातपडताळणी समितीकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत याविषयी माहिती मागवली होती. त्यानुसार मुंबई शहर कार्यालयाचा उपलब्ध अभिलेख तपासण्यात आला. त्यामध्ये समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे कोणतेही जातपडताळणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.

याबाबत यादव म्हणाले की, वानखेडे यांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलेच नसेल, तर नोकरीत रुजू होताना त्यांनी नेमके कोणते जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले, हा संशोधनाचा विषय आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news