IPL Auction : खेळाडूंच्या लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी बंगळूर येथे आयोजन

IPL Auction : खेळाडूंच्या लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी बंगळूर येथे आयोजन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावाची (IPL Auction) तारीख जवळपास निश्चित झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होऊ शकतो. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी, सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली आहे. याशिवाय, लवकरच दोन नवीन आयपीएल संघ लखनऊ आणि अहमदाबाद देखील त्यांच्या पहिल्या 3 खेळाडूंच्या नावांची घोषणा करतील.

आयपीएल 2022 मध्ये, यावेळी 8 ऐवजी 10 संघ भाग घेतील. गोयंका ग्रुपची लखनऊ फ्रँचायझी यात सहभागी आहे. सीव्हीसी ग्रुपला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अहमदाबाद संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब झाले आहे. आयपीएल २०२२ भारतातच आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड मेगा लिलावापूर्वी देशातील कोरोना परिस्थिती आणि रुग्णांची संख्या देखील विचारात घेत आहे. (IPL Auction)

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, सीव्हीसी ग्रुपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर बोर्ड आता कोणत्याही अडचणीशिवाय आयपीएलचा मेगा लिलाव आयोजित करू शकतो. दोन नवीन आयपीएल संघांपैकी लखनऊने अलीकडेच अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. याशिवाय भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरची संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (IPL Auction)

आयपीएलच्या मागील हंगामातील विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे. चेन्नईने फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. कोविड-१९ मुळे ही स्पर्धा दोन भागात खेळवली गेली. पहिला भाग एप्रिलमध्ये भारतात खेळला गेला. त्यानंतर स्पर्धेचा दुसरा भाग आणि बाद फेरीचे सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये खेळवले गेले. (IPL Auction)

३० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या रिटेन्शन लिस्टमध्ये अनेक आश्चर्यकारक नावे समाविष्ट करण्यात आली होती, याशिवाय अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत जे यावेळी आयपीएलच्या मेगा लिलावात दिसू शकतात. सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, हार्दिक पांड्या, कागिसो रबाडा, बेन स्टोक्स, डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंना या मेगा लिलावात अधिक पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे.

लखनऊने राहुलला त्यांच्या टीममध्ये सामील होण्यासाठी २० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. २०१८ मध्ये पंजाब किंग्सने केएल राहुलला ११ कोटींना विकत घेतलं होतं. जर राहुल लखनऊमध्ये सामील झाला तर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरेल. केएल राहुलने आयपीएलच्या गेल्या काही हंगामात अप्रतिम फलंदाजी केली आहे. याचा फायदा त्याला नक्कीच मिळेल. त्याचबरोबर राहुलने २७ सामन्यात संघाचे नेतृत्वही केले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक फ्रँचायझी राहुलच्या मागे जाईल.

सनरायझर्स हैदराबादने (SRH) राशिद खान सोडून दिले त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. राशीदला लिलावात चांगली बोली मिळू शकते. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीकडून खेळत असलेला युझवेंद्र चहललाही मोठी बोली मिळू शकते. या दोन्ही खेळाडूंवर मेगा लिलावात १० कोटींहून अधिक बोली लावली जाऊ शकते असा अंदाज आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर आयपीएल आयोजित केल्यामुळे या दोन्ही फिरकीपटूंना त्याचा फायदा होईल अशी शक्यता आहे.

रिटेन झालेले खेळाडू…

1. रवींद्र जडेजा – 16 कोटी
2. रोहित शर्मा – 16 कोटी
3. ऋषभ पंत – 16 कोटी
4. विराट कोहली – 15 कोटी
5. केन विल्यमसन – 14 कोटी
6. संजू सॅमसन – 14 कोटी
7. मयंक अग्रवाल – 12 कोटी
8. जसप्रीत बुमराह- 12 कोटी
9. आंद्रे रसेल- 12 कोटी
10. एमएस धोनी – 12 कोटी
11. ग्लेन मॅक्सवेल- 11 कोटी
12. जोस बटलर- 10 कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news