सोलापूर : एकाच वेळी दोन वधूशी लग्न करणार्‍या नवरदेवाविरुद्ध गुन्हा दाखल

एकाच वेळी दोन वधूशी लग्न
एकाच वेळी दोन वधूशी लग्न

अकलूज (सोलापूर), पुढारी वृत्‍तसेवा : माळेवाडी-अकलूज येथे एकाच वेळी दोन मुलींशी लग्न केलेल्या वराविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एकाचवेळी दोन मुलींशी लग्न करून प्रकाशझोतात आलेला नवरदेव गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेवाडी-अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे शुक्रवारी (दि. 2 ) दुपारी साडेबाराज्या सुमारास गट नंबर 2 येथील अतुल अवताडे याने डोंबिवली- मुंबई येथील रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह करून द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले. या प्रकरणी अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अतुल अवताडे यांच्या विरुद्ध व्दिभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news