

वसमत, पुढारी वृत्तसेवा : देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा आणि धर्मांतर विरोधी कायदाही लागू करावा. दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. या मागणीसाठी हिंदू संघटनांच्यावतीने मूक मोर्चा काढून राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
संपूर्ण देशामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा बनवून, यामध्ये दोषी आढळणारावर कठोर कारवाईची तरतूद करून ही सर्व प्रकरणे हाताळण्याकरिता स्पेशल कोर्टाची नियुक्ती करण्यात यावी. एक स्वतंत्र विभागाची स्थापना करावी. तसेच कोणत्याही प्रकारचे प्रलोभने, धमकावणे अथवा फसवणूक इत्यादी प्रकारे सुरू असलेले धर्मांतरण रोखणे करिता कायदा करून असे बेकायदेशीर धर्मातरण करण्यावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरिता स्वतंत्र विभाग स्थापन करावे, यासह विविध मागण्यांसाठी रविवारी शिव उद्यान येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन मूक मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा :