यवतमाळ : बस व कारची समोरासमोर धडक; चार ठार, तीन जखमी | पुढारी

यवतमाळ : बस व कारची समोरासमोर धडक; चार ठार, तीन जखमी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : नेर शहरालगत असलेल्या लोणीजवळ भरधाव कार आणि एसटी बसचा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी १०.३० वाजता  झाला. यामध्ये चालक व त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित गंभीर जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पाच पैकी दोन जणांचा मृत्‍यू झाला. तर इतर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

अभियंता राधेश्याम अशोक इंगोले (वय २६), त्याची आई रजनी अशोक इंगोले (वय ४५) दोघे (रा. रुपनगर वडगाव रोड, यवतमाळ) वैष्णवी संतोष गावंडे (वय १८), सारिका प्रमोद चौधरी (वय २८) (रा. पिंपळगाव जि. वाशिम) अशी मृतांची नावे आहेत. साक्षी प्रमोद चौधरी (वय १९), प्रमोद पांडुरंग चौधरी (वय ४५), सविता संतोष गावंडे (वय ४४) हे तिघेही गंभीर जखमी आहे. एसटी बसमध्ये असलेले सचिन शेंद्रे, धनंजय मिटकरी हे दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

राळेगाव आगाराची बस यवतमाळवरून अमरावतीला जात होती. एमएच-२९-बीसी-९१७३ या कारमधून तीन कुटुंबातील सात जण अमरावतीवरून यवतमाळकडे येत होते. कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कार चालक राधेश्याम इंगोले, त्याची आई रजनी इंगोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर यवतमाळ रुग्णालयात उपचारादरम्यान वैष्णवी गावंडे व सारिका चौधरी या दोघींचा मृत्‍यू झाला.

नेर येथील रुग्णसेवक शंकर भागडकर, नाना घोंगडे, राजेश खोडके, प्रमोद राणे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने नेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यवतमाळ येथे जखमींवर उपचारानंतर दोन महिलांना नागपूर येथे हालवण्यात आले आहे.

हेही वाचा  

परभणी : राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी सेवा संघाचा गौरव 

मुख्यमंत्र्यांनी घेतला आमदार प्रसाद लाड यांचा इतिहासाचा धडा !

नाशिक : विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा झाडावर आदळून मृत्यू

 

Back to top button