साहसी मोहीमेवर निघालेल्या विमानांचे नागपुरात उत्साहात स्वागत

साहसी मोहीमेवर निघालेल्या विमानांचे नागपुरात उत्साहात स्वागत

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभ्रमणाला निघालेली भारतीय हवाई दलाची मायक्रो लाईट विमाने नागपुरात दाखल झाली. या विमानांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. एडव्हेंचर रिंगच्या नेतृत्वात हलक्या वजनाची ही 4 विमाने गया ते बंगलोर दरम्यान 5 हजार किलोमीटरच्या साहसी मोहीमेवर निघाली आहेत. चार मायक्रो लाईट विमानांचा 17 दिवसांच्या मोहिमेत समावेश आहे.

ही मोहीम तरुणाईमध्ये हवाई सेवेबद्दल विश्वास निर्माण करेल, असे मत या चमूतील सदस्यांनी व्यक्त केला. नागपूरनंतर यवतमाळ, नांदेड आणि पुढे बंगळूर असे तब्बल 5 हजार किलोमीटर अंतर ही विमाने कापणार आहेत. काही ठिकाणी एअर शो देखील होणार आहे. नागपूरवरून यवतमाळ, नांदेडमार्गे पुढे बंगळुरला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बदललेले हवामान, गारठा आणि वारा यामुळे काहीशा अडचणी येत असल्याचे सांगितले.

कर्नल लक्ष्मीकांत यादव हे टीम लीडर आहेत. ब्रिगेडियर संदीप सिन्हा, कर्नल राहुल मनकोटिया, कर्नल विक्रम शेखावत, नायक प्रदीप सिंह, कर्नल पी. पी. सिंग, कर्नल डी. एस. फणसाळकर, लेफ्टनंट कर्नल अरुण प्रकाश, लेफ्टनंट कर्नल बी.पी. सिंग, लेफ्टनंट कर्नल अनुप कुमार सिंग, लेफ्टनंट कर्नल अमित सांगवन, लेफ्टनंट कर्नल दीप्ती शर्मा, मेजर पियुष शर्मा, नायक राजकुमार रावजी, नायक विपिन शर्मा, शिपाई प्रफुल्ल फुकन, सुभेदार विनोद आदींचा या मोहीमेत समावेश आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news