BSF jawan : अमृतसरमध्‍ये ‘बीएसएफ’ मेसमध्‍ये सहकार्‍याच्‍या गोळीबारात ४ जवान ठार, ६ जखमी

गोळीबारात जखमी झालेल्‍या जवानांना अमृतसर येथील गुरु नानक देव हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.
गोळीबारात जखमी झालेल्‍या जवानांना अमृतसर येथील गुरु नानक देव हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.

अमृतसर : पुढारी ऑनलाईन
अमृतसरमध्‍ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मसेमध्‍ये जवानाने ( BSF jawan ) सहाकार्‍यांवर आज सकाळी अंदाधूंद गोळीबार केला. या धक्‍कादायक घटनेत ४ जवान ठार झाला असून, दहा जण जखमी झाल्‍याचे वृत्त आहे. कटप्‍पा असे गोळीबार करणार्‍या बीएसएफ कॉन्‍स्‍टेबलचे नाव असून, त्‍याला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

BSF jawan : गोळीबारानंतर कॉन्‍स्‍टेबलची आत्‍महत्‍या

अमृतसरपासून सुमारे १३ किलोमीटर अंतरारव बीएसएफचे मुख्‍यालय आहे. येथे १४४ बटालियनचे जवान तैनात होते.आज सकाळी कॉन्‍स्‍टेबल सत्तेप्‍पा हा मेसमध्‍ये आला. त्‍याने अचानक सहकार्‍यांवर गोळीबार केला. या घटनेने एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच तत्‍काळ पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतील.

गोळीबार करणार्‍या कॉन्‍स्‍टेबल सत्तेप्‍पा याने स्‍वत:वर गोळी झाडून आत्‍महत्‍या केली. जखमी जवानांना गुरु नानक देव हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. उपचार सुरु असताना तीन जवानांचा मृत्‍यू झाल्‍याचे सूत्रांनी सांगितले. कॉन्‍स्‍टेबल सत्तेप्‍पा याने गोळीबार का केला याचे कारण अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या घटनेच्‍या सखोल चौकशीचे आदेश बीएसएफने दिले आहेत.

सीमेवरील तैनातीवरुन सत्तेप्‍पा याचा अधिकार्‍यांबरोबर वाद झाला होता. त्‍यामुळे तो नाराज होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

हेही वाचा ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news