महामुंबईत इमारत कोसळण्याचे सत्र सुरुच ; आता वांद्रेत इमारत कोसळली

वांद्रे आग
वांद्रे आग

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

वांद्रे येथील एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता आहे. ५ ते ६ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. वांद्रे परिसरातील बेहराम पाड्यातील प्राध्यापक अनंत काणेकर मार्गावर, रझा मशिदीजवळ ही इमारत आहे.

या घटनेत अडकलेल्या ६ जणांना बाहेर काढण्यात जवानांना यश आल्याची माहिती मिळाली आहे. यातील २ पुरुष आणि २ महिलांना व्ही. एन देसाई रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news