Indapur Congress Bhavan : इंदापूर काँग्रेस भवनवरून हर्षवर्धन पाटील-आमदार जगताप आमनेसामने!

Indapur Congress Bhavan : इंदापूर काँग्रेस भवनवरून हर्षवर्धन पाटील-आमदार जगताप आमनेसामने!
Indapur Congress Bhavan : इंदापूर काँग्रेस भवनवरून हर्षवर्धन पाटील-आमदार जगताप आमनेसामने!
Published on
Updated on

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर इंदापूर शहरातील काँग्रेस भवन बरेच (Indapur Congress Bhavan) वर्षे बंद अवस्थेत होते. या बंद काँग्रेस भवनचे कुलूप काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त तोडून आत प्रवेश करीत हे भवन काँग्रेसचेच असल्याचा दावा केला आहे. तर भाजपाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही मालमत्ता सार्वजनिक असून याचा कुठलाही वाद नाही ही जागा ट्रस्टची असून इंदापूर तालुक्याच्या जनतेसाठी आहे असा प्रतिदावा केला आहे. यामुळे इंदापुरात काही काळ तणाव निर्माण झाला होता; मात्र पोलिसांनी तणाव निवळत हा न्यायालयीन लढा असल्याचे सांगितले.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी इंदापुरात येऊन बंद असलेल्या काँग्रेस भवनचे कुलूप हातोड्याने तोडून आतमध्ये प्रवेश केला. हे भवन काँग्रेस पक्षाचे असून सन १९७० पासून काँग्रेस भवन जनतेसाठी खुले करण्यात आले असा दावा करत हे काँग्रेस भवन आमचेच असल्याच्या भूमिकेवर ठाम आहे असा दावा केला. दरम्यान काँग्रेस भवनच्या बंद अवस्थेतील इमारतीत प्रवेश केल्यानंतर इंदापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, काका देवकर, चमन बागवान, झकिर काझी , व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष आमदार जगताप यांचे पुष्पहार घालून व काँग्रेसचा ध्वज उंचावून स्वागत केले. (Indapur Congress Bhavan)

दरम्यान, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी आपण पोलीस स्टेशनला जाऊन चर्चा करू असे सांगत उपस्थितांना पोलीस स्टेशनला बोलावले. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलविण्यात आले. या ठिकाणी इंदापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून शांतता बाळगावी. या जागेबाबत न्यायालयीन लढाई सुरू असून आत्ताच निर्णय देता येणार नाही, असे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ही सार्वजनिक मालमत्ता असून अखिल भारतीय काँग्रेसचा आणि या मालमत्तेचा कसलाही संबंध नाही. ही ट्रस्टची जागा असून ती ट्रस्टचीच राहणार आहे. सध्या त्याच्या चाव्या आमच्याकडेच असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना चाव्या देखील दाखवल्या. याबाबत कुठलाही वाद नसून भवन आमचे आहे म्हणणाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश आणावा असे सांगितले. यावेळी भरत शहा, बापु जामदार, शकिल सय्यद, मेघशाम पाटील, पांडुरंग शिंदे, कैलास कदम आदी उपस्थित होते. (Indapur Congress Bhavan)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news