Brij Bhushan Sharan Singh : ‘साजिश के पीछे कौन; राजीनामा देण्याचा प्रश्नचं येत नाही’ : बृजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Singh In Court
Brij Bhushan Singh In Court

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) हे आपल्या पदाचा राजीनामा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे. यावरुन बोलताना ते म्हणाले की,"राजीनामा देण्याचा प्रश्नचं येत नाही" यासंदर्भात मी आज (दि.२०) चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. वाचा सविस्तर बातमी.

Brij Bhushan Sharan Singh : काय आहे प्रकरण

विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह देशातील ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेत्यांसह इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि अन्य काही प्रशिक्षकांवर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणाचा निषेध करत बृजभूषण यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याची गंभीर दखल क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाने महासंघाच्या कामकाजातील गैरव्यवस्थापनाचे WFI कडे स्पष्टीकरण मागितले आहे.

क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, हे प्रकरण खेळाडूंच्या भवितव्याशी संबंधित असल्याने मंत्रालयाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. जर WFI निर्धारित वेळेत उत्तर दिले नाही तर क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, 2011 च्या तरतुदीनुसार महासंघाविरुद्ध पुढील कारवाई करेल. दरम्यान, 18 जानेवारीपासून सुरू होणारे राष्ट्रीय कुस्ती शिबिर तूर्तास रद्द करण्यात आले आहे. मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर 18 जानेवारी पासून लखनऊ येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 41 पैलवान, 13 प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह सुरू होणार होते, ते रद्द करण्यात येत आहे.

आपल्याविरोधात कटकारस्थान

तर सुत्रांच्या माहितीनुसार, अयोध्या इथे कुस्ती महासंघाची २२ जानेवारीला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत बृजभूषण सिंह हजर राहणार आहेत. याच बैठकीत ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे. त्यांनी आपल्यावरील आरोप नाकारले होते. आपल्याविरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर आपण फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने या प्रकरणाची चौकशी करू शकत नाही, असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे. पण एका वृत्तवाहिनीशी बोलताना बृजभूषण सिंह यांनी म्हंटलं आहे की, "राजीनामा देण्याचा प्रश्नचं येत नाही, यासंदर्भात मी आज (दि.२०) चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यात आपण या मुद्द्यावर बोलू.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news