बृजभूषण सिंह राजीनामा देणार? | पुढारी

बृजभूषण सिंह राजीनामा देणार?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अयोध्या इथे कुस्ती महासंघाची २२ जानेवारीला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत बृजभूषण सिंह हजर राहणार आहेत. याच बैठकीत ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे.

लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांनंतर बृजभूषण सिंह यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी आपल्यावरील आरोप नाकारले होते. आपल्याविरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर आपण फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने या प्रकरणाची चौकशी करू शकत नाही, असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते.

Back to top button