Soorarai Pottru : सूर्या स्टारर हिंदी रिमेकमध्ये दिसणार अक्षय कुमार

actor akshay kumar and suriya
actor akshay kumar and suriya
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपटांची सुपरस्टार सुर्या शिवकुमारचा 'सूरराई पोत्रू' (Soorarai Pottru) या चित्रपटाचे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक झाले. दक्षिण भारतातील प्रेक्षकांना प्रभावित केल्यानंतर आता 'सूरराई पोत्रू' चित्रपटाचे निर्माते त्याचा हिंदी रिमेक येत आहेत. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, काही रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की अक्षय कुमारला 'सूरराई पोत्रू' चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सुर्याची भूमिका करण्यासाठी साइन केले आहे. मात्र, अद्याप अक्षय कुमार किंवा त्याच्या टीमकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या रिमेकमध्ये अभिनेत्री राधिका मदन अक्षय कुमारसोबत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या वृत्ताला राधिकाच्या बाजूने अद्याप कोणतेही दुजोरा देण्यात आलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, राधिका या चित्रपटात अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारू शकते, जी अभिनेत्री अपर्णा बालमुरली हिने तमिळ 'सूरराई पोत्रू'मध्ये सूर्यासोबत काम केले होते.

सध्या हा चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांनी पश्चिम भारतात चित्रपटाची मांडणी केली आहे. या चित्रपटात राधिका मदन ग्रामीण मराठी महिलेची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी राधिकाला चित्रपटाच्या फ्लोरवर जाण्यापूर्वी काही मराठी शैलीत बोलणे शिकावे लागेल. या महिन्यात, चित्रपटाचे निर्माते काही कार्यशाळा घेण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून चित्रपटाचे शूटिंग देखील लवकरच सुरू होईल.

'सोराराई पोत्रू' चित्रपटाची कथा एअर डेक्कनचे संस्थापक जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित आहे. जी.आर.गोपीनाथ ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी सर्वसामान्यांना विमान प्रवास परवडेल, अशी योजना आखली होती. या चित्रपटात सूर्या शिवकुमारने गोपीनाथची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. एवढेच नाही तर या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली. या चित्रपटाला ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते, पण दुर्दैवाने हा चित्रपट ऑस्करला मुकला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news