पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायल- हमास युद्धाने संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवले आहे. गेली १२ दिवस सुरु असलेल्या या संघर्षामध्ये हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. मागील काही दिवसांपासून युद्धाची तीव्रता कमी करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे 'मॅरेथॉन डिप्लोमसी' मध्ये ( Marathon Diplomacy ) गुंतले आहेत, असे वृत्त 'एनबीसी न्यूज'ने दिले आहे. जाणून घेवूया नेमकी मॅरेथॉन डिप्लोमसी आहे तरी काय? या विषयी
इस्त्रायल -हमास युद्धाची तीव्रता कमी करणे हा मॅरेथॉन डिप्लोमसी'चा प्रमुख हेतू आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी इस्रायलला भेट देण्यापूर्वी सौदी अरेबियाला गेले. यॆथे त्यांनी सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली. हमासने ओलीस ठेवलेल्या इस्त्रायली नागरिकांची सुटका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती ब्लिंकन यांना केली.
यानंतर ब्लिंकन यांनी सोमवार. १६ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल ९ तास चर्चा झाली. यावेळी काही ठोस निर्णय घेण्यात आले. आता अमेरिका आणि इस्रायल एक धोरण आखणार असून, त्यानुसार गाझा शहरातील नागरिकांना मदत करण्याची ही योजना आहे. सर्वसामान्य नागरिकांना युद्ध झळा बसू नयेत, हा याचा मुख्य हेतू असल्याचे ब्लिन्केन यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेचे तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र हे सर्व प्रयत्न अमेरिकेच्या मॅरेथॉन डिप्लोमसी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
अरब देश आणि या देशातील नागरिकांना युद्ध झळ बसू न देता, हमासचे समूळ उच्चाटन करण्याचा इस्रायल मदत करणे, हे अमेरिकेचे धोरण आहे. तसेच इस्त्रायलला गाझा शहरावर जमिनीवरील युद्धापासून परावृत्त करत अरब देशांना इस्रायलविरोधात ठोस भूमिका घेण्यापासून लांब ठेवणे, अशीही त्यांची रणनीत आहे. व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ जेफ झियंट्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "लोकशाही आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी अँटनी ब्लिंकन हे 'मॅरेथॉन डिप्लोमसी' मध्ये गुंतले आहेत, ब्लिन्केन मागील एक आठवड्यापासून मध्य पूर्वेतील युद्धावर नजर ठेवून आहेत. गेल्या १३३ तासांमध्ये सात देशांमध्ये सकारात्मक चर्चेसाठी त्यांनी प्रयत्न केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी चर्चाही केली. ब्लिन्केन यांचे अरब देशांशी संपर्कात राहण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत."
अमेरिकेचे राष्ट्राध्य ज्यो बायडेन यांनी इस्त्रायलला भेट दिल्यानंतर ब्लिंकन अम्मानला भेट देणार आहेत. पूर्वी त्यांची योजना थेट इस्रायलहून परतण्याची होती, मात्र आता ते अम्मानच्या दौऱ्यावर जातील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :