Israel-Palestine Conflict | ‘गाझा’ शहरातील हॉस्पिटल हल्ल्यानंतर ‘जो बायडेन’ यांना धक्का; अरब नेत्यांची शिखर परिषद रद्द

Israel-Palestine Conflict
Israel-Palestine Conflict
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमास आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढतच आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्रायल दौऱ्यावर येण्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. गाझामधील अल अहली अरब हॉस्पिटलवरील हल्ल्याचा परिणाम शिखर परिषदेवर झाला आहे. पॅलेस्टिनी नेते महमूद अब्बास यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ नियोजित बैठकीतून माघार घेतल्यानंतर जॉर्डनमधील अम्मान येथे होणारी अरब नेत्यांची शिखर परिषद रद्द करण्यात आली आहे. (Israel-Palestine Conflict)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आता फक्त इस्रायलला भेट देतील आणि त्यांचा जॉर्डनचा दौरा पुढे ढकलतील, असे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काल रात्री गाझामधील अल अहली अरब हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला. यामध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. सुमारे ५०० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेलेत. या घटनेनंतर पॅलेस्टिनी नेते महमूद अब्बास यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ नियोजित बैठकीतून माघार घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अरब देशांची 'अम्मान शिखर परिषद' पुढे ढकलण्यात आली आहे. (Israel-Palestine Conflict)

अल अहली अरब हॉस्पिटवरील हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचे गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर हमासचा हा दावा फेटाळत, इस्रायली सैन्याने या हल्ल्यात आमचा कोणताही संबंध नाही आणि पॅलेस्टिनी रॉकेट चुकीच्या पद्धतीने फायर झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले आहे. (Israel-Palestine Conflict)

दरम्यान, जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफादी यांनी 'हे युद्ध आणि ही आक्रमकता गाझा पट्टी प्रदेशाला विनाशाकडे' नेत असल्याचे म्हटले आहे. पुढे त्यांनी असे देखील म्हटले आहे की, जॉर्डने तेव्हाच अरब नेत्यांच्या परिषदेचे आयोजन करेल जेव्हा हे युद्ध थांबेल अन् पॅलेस्टिनी लोकांच्या मानवतेचा आदर करेल. तसेच अनेक देश यामध्ये मदत करतील. जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अरब नेत्यांची शिखर परिषद आयोजनाच्या अडचणी वाढल्या असून, जो बायडेन यांच्या भूमिकेमुळे ते अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news