पुढारी ऑनलाईन डेस्क
बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचा महाविजेता'विशाल' निकम ठरला. त्याने विजय मिळाल्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिलीय. त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत. 'विशाल' निकमने माऊली म्हणत इन्स्टाग्रामवर पोस्टची सुरूवात केलीय. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर काय लिहिलंय-
माऊली ? Thank you जनता Love you Vishhalians ❤️
मी नेहमीच बोलत आलोय तुम्ही हाय म्हणून मी हाय, तुम्ही माझ्यावर केलेल्या विशालप्रेमाची ? ही पोच पावती आहे.
तुम्ही केलेलं प्रत्येक वोट, कमेंट, मेसेज त्या साठी खूप धन्यवाद ?
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!
राम कृष्ण हरी!
याचबरोबर त्याने #विशालप्रेम म्हणत एक फोटोही शेअर केलाय.
१०० दिवस, १७ सदस्य आणि एक ट्रॉफी ! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होते विजेता कोणी एकच असणार आहे. कार्यक्रमाच्या तिसर्या पर्वाला देखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो.
बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या तिसर्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या तिसर्या पर्वाचा विजेता मिळाला. विशाल निकम ठरला बिग बॉस मराठीच्या तिसर्या पर्वाचा विजेता तर जय दुधाणेने पटकावले दुसरे स्थान. विशाल निकमला २० लाख इतकी धनराशी मिळाली आणि ट्रॉफी.