Salman Khan : सल्लू भाईला डेंग्यूची लागण, करण जोहर सांभाळणार ‘बिग बॉस’ शो

Salman Khan
Salman Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा दबंग सलमान खानला डेंग्यू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान (Salman Khan) मागील दोन आठवड्यांपासून 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. यादरम्यान, त्याला डेंग्यूची लागण झाली. डेंग्यूची लागण झाल्यामुळे सलमान वीकेंड का वारदेखील होस्ट करणार नाही. (Salman Khan)

सलमान खानची प्रकृती मागील चार-पाच दिवसांपासून खराब आहे. डेंग्यूमुळे त्याने चित्रपट आणि शोचे शूटिंग बंद केले आहे.
टीव्हीचा लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉसचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. या शोच्या अपकमिंग वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसणार नाही. कारण त्याच्यावर उपचार सुरु आहेत. यासाठी 'वीकेंड का वार' करण जोहर होस्ट करत आहे. शोचा प्रोमोदेखील आला आहे. यामध्ये करण जोहर स्पर्धकांचा क्लास घेताना दिसत आहे.

बिग बॉसच्या आधी करण जोहर बिग बॉस ओटीटीदेखील होस्ट करताना दिसत आहे. करण जोहरने आपल्या अंदाजाने बिग बॉस ओटीटी शो ला हिट बनवलं आहे. लेटेस्ट प्रोमोमध्ये करण जोहर गोरी नागौरीवर संताप व्यक्त कराताना दिसणार आहे. प्रोमो पाहून वाटत आहे की, करण जोहर सलमान खानची कमी नक्की भरून काढेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news