Diwali Safety Tips : दिवाळीत फटाके लावतायं? तर अशी घ्या काळजी | पुढारी

Diwali Safety Tips : दिवाळीत फटाके लावतायं? तर अशी घ्या काळजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी सकारात्मक उर्जेचा सण. चैत्यनाचा उत्साहाचा सण म्हणून या सणाकडे पाहिलं जातं. प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. मानवी नातेसंबध दृढ करणारा हा सण आपल्याकडे खूप वर्षांपासून आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. पण कालपरत्वे या सणाच स्वरुप बदलत गेलं. धनत्रयोदशीपासून या सणाला सुरुवात होते. दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणात हौशी लोक फटाकेही वाजवताना तुम्हाला पाहायला मिळतील. पण हे फटाके लावत असताना काही नुकसानकारक (Diwali Safety Tips) होणार नाही ना याची पण काळजी पण घेणे गरजेच असतं. आज आपण आपणं दिवाळीत फटाके लावताना काय काळजी घ्यायची हे पाहणार आहोत.   

  • फटाके लावताना अशी घ्या काळजी 

दिवाळी सण आनंदाचा सण हाच आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. छोट्यांपासुन मोठ्यापर्यंत फटाके लावत असतात. या फटाक्यांमध्ये बऱ्याच प्रकारची वैविधता पाहायला मिळते. फटाके लावताना तुमच्याकडून गडबडीत काही नुकसान होवून तुमच्या दिवाळीला गालबोट लागणार नाही ना याची पण काळजी घेणे गरजेच असते. 

 काळजीपूर्वक फटाके लावा 

बरेचजण दिवाळीत फटाके लावत असतात.पण ते फटाके लावत असताना काळजीपूर्वक आणि जबाबदारीने लावा. त्याचबरोबर दुसऱ्यांनाही सांगा फटाके काळजीपूर्वक लावा. जर आपण काळजीपूर्वक फटाके लावल्यास नकळतपणे होणारा अनर्थ टळू शकतो. 

Diwali Safety Tips : सौम्य फटाके लावा

दिवाळीत आवर्जून सौम्य फटाके लावण्याचा प्रयत्न करा. जर का तुमच्या घऱात जर लहान मुलं असतील तर त्यांना मोठ्या आणि स्फोटक असे फटाके द्या. सौम्य फटाक्यांनी लावल्यास ध्वनीप्रदुषण आणि हवा प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. 

 मुले फटाके लावताना त्यांच्याबरोबर राहा

जर मुले फटाके लावत असतील तर शक्यतो त्यांच्याबरोबर राहा. कारण मुलांना होणाऱ्या अनर्था बद्दल आणि त्याची परिणामकारकता माहित नसते.  बऱ्याचवेळा मुलं उत्साहाच्या भरात फटाके लावत असताना अतातायीपणा करत असतात. कोणताही अनर्थ होवू नये म्हणून मुलांना शक्यतो मुलांना एकावेळी एकच फटाके लावायला द्या.  फटाके लावत असताना ठराविक अंतर ठेवायला शिका. शक्यतो लहान मुलांना फटाके लावायची परवानगी देवू नका. 

 ध्वनी आणि हवा प्रदुषण होणारे फटाके टाळा

शक्यतो फटाके हे सौम्य लावायचा प्रयत्न करा. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषण आणि हवा प्रदुषण होणार नाही ना याची काळजी घेईल. बऱ्याच प्रकारची असे फटाके आहेत जे मोठ्या प्रमाणात फटाके ध्वनी प्रदुषण करत असतात. सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदुषण होणार नाही ना याची काळजी घ्या. 

फटाके लावताना घाई करु नका

फटाके लावताना कोणत्याही प्रकारची घाई करु नका. तुमची एक चुक तुमच्या अंगलट येवून तुम्ही जखमी होवू शकता. एका शिस्तीत फटाके लावा. फटाक्यांसाठी खुली जागा नेहमी सुरक्षित असते. वस्तीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडणे शक्यतो टाळावे.

फटाके बॉक्सवरील सुचनांचे पालन करा

फटाक्यांच्या कव्हर किंवा बॉक्सवर सुरक्षाविषयक सुचना दिलेल्या असतात. त्या काळजीपूर्वक वाचा आणि त्यांच पालन करण्याचा प्रयत्न करा. लहान मुलं असतील तर त्यांना वडीलधाऱ्या माणसांनी त्या सुचनांविषयी समजावून सांगावे. न फुटलेल्या फटाक्यांना हात लावू नये. असे लहान मुलांना आवर्जून सांगा.

 फटाक्यांजवळ दिवे, अगरबत्ती किंवा मेणबत्ती ठेवू नये

फटाक्यांमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात. जी स्फोटक असतात. शक्यतो फटाक्यांजवळ दिवे, मेणबत्ती, अगरबत्ती किंवा विस्तव ठेवू नये. यांचा संपर्क फटाक्यांशी आल्यास स्फोट होण्याची शक्यता असते.

Diwali Safety Tips : दुर्घटना झाल्यास काय कराल?

जर कुठे नकळतपणे कुठे फटाक्यांनी दुर्घटना झाल्यास प्रथम  दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला धीर द्या. त्याला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जा. थोडी सौम्य  स्वरूपाची जखम असेल तर घरगुती उपाय कराच पण डॉक्टरांचाही सल्लाही घ्या.  कुठे आग लागली असेल तर आग विझविण्यासाठी जाडसर पोतं किंवा जाड चादरीचा वापर करा. 

आपली दिवाळी कशी पर्यावरण पूरक होईल याच्यावर भर द्या.  चला तर मग आपली दिवाळी उत्साहात, सकारात्मक विचाराने, आनंदाने साजरी करुया. तुम्हा सर्वांना दिवाळी सणाच्या खूप शुभेच्छा. हा सण तुमच्या आयुष्यात आनंद. उर्जा, समृद्धी घेवून येवो.

हेही वाचलंत का?

Back to top button