Bigg Boss-17 : टीव्ही क्वीन एकता कपूरचा अंकिता लोखंडे-विकी जैनला पाठिंबा

ankita-vicky
ankita-vicky

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन बिग बॉस-१७ चे घर तुफान गाजवत आहेत. दरम्यान, या सीझनमधील सर्वात चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी ते एक स्पर्धक बनले आहेत. (Bigg Boss-17) रिअॅलिटी शोमधील या जोडप्याच्या प्रवासाने केवळ चाहत्यांनाच उत्सुकता निर्माण केली नाही तर भारतीय मनोरंजन उद्योगातील अनेक नामवंत व्यक्तींचा पाठिंबाही मिळवला आहे. (Bigg Boss-17)

संबंधित बातम्या – 

टीव्ही क्वीन एकता कपूरनेदेखीस या डायनॅमिक जोडीला इन्स्टाग्रामद्वारे आपला पाठिंबा दर्शविला आहे. एकता कपूर असंख्य यशस्वी टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमागील पॉवरहाऊस, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. तिने अंकिताची सर्वात व्यावसायिक अभिनेत्यांपैकी एक आणि उद्योगातील सर्वोत्कृष्ट लीड्सपैकी आहे, अशी प्रशंसा केली आहे.

एकता कपूरचा पाठिंबा या जोडप्यासाठी नक्कीच खास ठरत आहे. जसजसा सीझन पुढे सरकतो तसतसे अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या मध्ये पुढे काय घडणार, हे बघणं उत्सुकतेच ठरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news