पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलीवूडचे महानायक ३३ वर्षांनीं पुन्हा एकत्र येणार आहेत. सिनेप्रमींना या दोन नायकांना पुन्हा पडद्यावर पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. दक्षिण इंडस्ट्रीतील दिग्गज रजनीकांत आणि बॉलीवूड शहंशाह अमिताभ बच्चन जवळपास ३३ वर्षांनी पुन्हा एकत्र येणार असून त्यांनी Thalaivar 170 ची घोषणा केलीय. रजनीकांत यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. (Thalaivar 170)
संबंधित बातम्या –
अमिताभ बच्चन आणि रजनीकांतचे फॅन्स जगभरात आहेत. या चित्रपटाचे टायटल 'थलाइवर 170' असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी एक्सवर (ट्विटर) फोटो शेअर केले आङेत.
पोस्टमध्ये रजनीकांत यांनी कॅप्शन लिहिले आहे, '३३ वर्षांनंतर मी श्री अमिताभ बच्चन यांच्यासोबत आगामी चित्रपट 'थलाइवर 170′ मध्ये काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे ग्नानवेल करतील. माझं मन आनंदाने भरून गेलं आहे.'