Archana Gautam : ‘अर्चनाला बिग बॉसमध्ये परत आणा’, नेटिझन्सची मोहीम

archna gautam-shiv thackeray
archna gautam-shiv thackeray

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस-१६ एका रोमांचक वळणावर जात आहे. स्पर्धक अर्चना गौतमने (Archana Gautam) बिग बॉसच्या घरात असं काही केलं की, ज्यामुळे बिग बॉसने तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याची झलक दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अर्चना गौतमने असे काही केले आहे जे आजपर्यंत बिग बॉसमध्ये कधीही घडले नाही. (Archana Gautam)

अर्चना आणि शिव यांच्यात भांडण

सर्वांना माहित आहे की, अर्चना आणि शिव यांच्यात अनेक दिवसांपासून भांडण सुरू आहे. बुधवारच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्क दरम्यान दोघांमध्ये खडाजंगी झाली. यानंतर अर्चनाने शिव ठाकरेचा गळा पकडला. मग काय, तमाशा सुरू झाला. अर्चना गौतमला बिग बॉसमधून काढून टाकण्याची मागणी झाली. याचा परिणाम असा झाला की, सर्वांची लाडकी अर्चनाला मध्यरात्री बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. हा निर्णय ऐकून अर्चना ढसाढसा रडली.

अर्चनाने काय केले?

मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना शिवविरोधात अश्लील कमेंट करत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. प्रकरण इतकं वाढलं की अर्चनाचा ताबा सुटला आणि तिने शिव ठाकरेचा गळा पकडला. अर्चनाने शिवाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. शिवाच्या मानेवर जखमेच्या खुणा दिसल्या. यानंतर बिग बॉसने दोघांनाही कन्फेशन रूममध्ये बोलावले. अर्चना-शिवामधील या शारीरिक हिंसाचारावर निर्णय घेण्याचे अधिकार बिग बॉसने सोडले. शिवने अर्चनाला घरातून हाकलून देण्याचा निर्णय घेतला.

अर्चना शोमधून बाहेर?

तिला घरी जाण्याची गरज नाही, तिच्या आई-वडिलांना तिला बिग बॉसमध्ये बघायचे आहे, असे म्हणत अर्चना रडतच राहिली. पण शिवने एकही न ऐकता अर्चनाला बाहेर काढण्याची मागणी केली. त्यानंतर बिग बॉसने घरातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अर्चना गौतमला बाहेर काढण्याचे आदेश दिले. वीकेंड का वारमध्ये या साऱ्या गदारोळावर सलमान खान काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरा प्रश्न जो चाहत्यांच्या मनात आहे तो म्हणजे अर्चना गौतम बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार का? लवकरच उत्तर मिळेल अशी आशा आहे.

नेटिझन्सकडून अर्चनाच्या वापसीची मागणी

नेटिझन्सकडून अर्चनाला बिग बॉसच्या घरता परत आणावे, अशी मागणी होत आहे. अर्चनाच्या समर्थनार्थ एक्स बिग बॉस विजेती गौहर खानने ट्विटदेखील केलं आहे. अर्चना ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्सना अर्चनावर दयादेखील येत आहे. अर्चनाने शिव ठाकरेला त्याच्या निर्णय परत घेण्याची विनंती देखील केली. पण, शिवने अर्चनाचे एकदेखील म्हणणे ऐकले नाही. अर्चनाने शिवला सॉरीदेखील म्हणण्याचा प्रयत्न केला. पण, शिवने तिला माफ केले नाही. आता अर्चना बिग बॉसमध्ये वापसी करेल की नाही, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news