पुणे : हिवाळ्यात नव्याने उद्भवतोय संधिवात | पुढारी

पुणे : हिवाळ्यात नव्याने उद्भवतोय संधिवात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या थंडीचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखीने नव्याने डोके वर काढले आहे. हिवाळ्यात संधिवाताच्या रुग्णांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. ऊबदार कपडे घालावेत, गरम पाण्याने आंघोळ करावी, झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात बुडवून ठेवावेत अशा उपायांचा रुग्ण अवलंब करताना दिसत आहेत.

वाढत्या थंडीचा रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे हिवाळयाच्या दिवसांमध्ये सांधे दुखत राहणे, सांध्यांना सूज येणे, सकाळी उठल्या उठल्या हात-पाय आखडणे, गुडघ्यांमध्ये प्रचंड वेदना होणे असे त्रास होतात. शरीरामध्ये जीवनसत्वांचा अभाव, हाडांसा ठिसूळपणा यामुळे अप्रत्यक्षपणे सांधेदुखीला आमंत्रण मिळते. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे केवळ ज्येष्ठांमध्येच नव्हे, तर तरुणांमध्ये संधिवात उदभवताना दिसून येत आहे.

अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अमित इंगळे म्हणाले, ”अमेरिकन कॉलेज ऑफ रिमेटोलॉजीच्या निकषांनुसार, विशिष्ट लक्षणे आणि प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या निष्कर्षांवर संधिवातामध्ये होणा-या बदलांची पाहणी केली जाते. हिवाळयात सांधेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सांध्यांमध्ये दाह निर्माण होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. गरम पाण्याने आंघोळ करणे, रात्री झोपताना पाय गरम पाण्यात बुडवून ठेवणे, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे.”

  • काय काळजी घ्यावी?
  • सकस आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे सांधेदुखी अधिक बळावते. त्यामुळे हिवाळयातही नियमितपणे व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
  • व्यायामामुळे हाडे, स्रायू आणि सांधे मजबूत राहतात. वयोमानानुसार, आपापल्या क्षमतेनुसार व्यायामप्रकाराची निवड करावी.
  • हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. त्यामुळे दररोज किमान 30-40 मिनिटे सूर्यप्रकाशाची
    गरज भासते.
  • हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा यांचा आहारात समावेश

 

Back to top button