हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पध्यामध्ये यावेळचीही निवडणूक रंगणार आहे. तेथे अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही नशीब आजमावू पाहत आहे. तथापि, सत्तेवर कोणता पक्ष मांड ठोकणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा सुकाळ…
हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या ६८ जागांसाठी आणखी दोन दिवसांनी म्हणजे १२ तारखेला चुरशीने मतदान होत आहे. या जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २३ टक्के म्हणजे ९४ उमेदवारांनी आपल्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडे दिली आहे. एडीआर संस्थेकडील माहितीनुसार, २०१७ च्या तुलनेत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांच्या संख्येत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांची संख्या ९ वरून २२ पोहोचली आहे माकपने यावेळी ११ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यातील ७ उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. इतर पक्ष त्याच्या पाठोपाठ आहेत. घुमारविन आणि ठियोग या मतदारसंघांत प्रत्येकी ४ उमेदवार असे आहेत की, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर अर्को, भटिया, आनी मतदारसंघांतील प्रत्येकी तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. ठियोग मतदारसंघाचे माकपचे उमेदवार राकेश सिंग यांच्यावर तब्बल ३० गुन्हे दाखल आहेत. याच पक्षाचे कसुंपटी मतदारसंघाचे उमेदवार कुलदीपसिंग तंवर यांच्यावर २०, तर पावटा साहिब मतदारसंघातील आपचे उमेदवार मनीष ठाकूर यांच्यावर १९ गुन्हे दाखल आहेत. आनी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार लोकेंद्र कुमार यांच्यावर ११, तर सिमला ग्रामीणमधील काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंग यांच्यावरही ११ गुन्हे दाखल आहेत.
राहुल गांधींच्या अनुपस्थितीची चर्चा…
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिमाचलमध्ये येऊन जोरदार प्रचार केला होता. यावेळी काँग्रेसला त्यांची अनुपस्थिती प्रकर्षानि जाणवत आहे. राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेत व्यग्र आहेत. त्यामुळे हिमाचलचा सगळा भार प्रियांका गांधी – वधेरा आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर येऊन पडला आहे. भाजपने राहुल यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा प्रचारादरम्यान उपस्थित केला आहे. पराभवाच्या भीतीने राहुल यांनी हिमाचलकडे पाठ फिरवली असल्याचे स्थानिक भाजप नेते जनतेला सांगत आहेत. भाजपच्या तुलनेत काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची फौज कमी आहे. राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, त्यांच्याविरोधात रणशिंग फुंकलेले सचिन पायलट, आजमावू पाहत आहे. तथापि, समेवर कोणता पक्ष मांडतीस मुख्यमंत्री भूपेंद्र प्रामुख्य प्रचारसभांना हजेरी लावत आहेत.
सर्वांत उंच ठिकाणावरील मतदानाकडे सर्वांचे लक्ष…
राज्यातील ताशीगंग हे केंद्र असे आहे की, जे सर्वांत उंचावर आहे. तब्बल १५ हजार २५६ फुटांवर वसलेल्या ताशीगँगमधील मतदानाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाहौल आणि स्थिती जिल्ह्यांच्या सीमेवर ताशीगँगमध्ये शंभर टक्के मतदान होईल, असा आशावाद आहे. भारत-चीन सीमेपासून हे गाव २९ किलोमीटर अंतरावर आहे. ताशीगंग आणि गेटे अशा दोन गावांतील लोक ताशीगंग मतदान केंद्रावर मतदान करतात. ताशीगंगची लोकसंख्या ७५ असून मतदारसंख्या केवळ ५२ आहे.
महिला मतदारांवर सर्व पक्षांची नजर… म
हिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षासहित सर्वच पक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे रिंगणात असलेल्या ४१२ जणांमध्ये केवळ २४ महिलांचा समावेश आहे. त्यातही भाजप आणि आपने प्रत्येकी सहा, तर काँग्रेसने तीन महिलांना संधी दिली आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी भाजपने स्त्री संकल्प पत्र जाहीर केलेले आहे. त्यात महिलांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देण्यात आली आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन महत्त्वपूर्ण ठरेल, असा भाजपच्या धुरिणांचा विश्वास आहे. तिकडे काँग्रेसने महिलांना दरमहा १५०० रुपयांची, तर आम आदमी पक्षाने एक हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
सिमल्याचा मॉल रोड पोस्टर वॉर केंद्र….
राजधानी सिमल्याचा मॉल रोड हा पर्यटकांचा आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. तथापि, हाच मार्ग आता काँग्रेस आणि भाजपच्या पोस्टर वॉरचा केंद्रबिंदू बनला आहे. मॉल रोडच्या पार्किंग लॉटला कॉंग्रेसचे कार्यालय आहे. या ठिकाणी पक्षाने असंख्य पोस्टर्स लावली आहेत. पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज लावण्यात भाजपसुद्धा मागे नाही. हिमाचल प्रदेशचा बहुतांश भाग डोंगराळ असला तरी सर्वत्र प्रचाराची रंगत दिसून येत आहे. त्यातही सिमला परिसर प्रचाराच्या रणधुमाळीने गजबजला आहे.
निर्मला पाटील, सिमला