पुढारी ऑनलाईन :
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याबाबत आज दुपारी तीन वाजता मोठा व्हिडिओ बॉम्ब फोडणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राणा दाम्पत्यांबाबत आणखी कोणता गौप्यस्फोट होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना खासदार तुमाणे यांच्या वक्तव्यानंतर राणा दाम्पत्यांच्या अडचणीत आणखी वाढ हाेणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.