World Tourism Day : ‘मॅडम सर’मधील कॉन्स्टेबल म्हणते, एकटी थायलंडला गेले

भाविका शर्मा
भाविका शर्मा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मालिका 'मॅडम सर'मध्‍ये कॉन्स्टेबल संतोष शर्माची भूमिका साकारणारी भाविका शर्मा म्‍हणाली, "माझी पहिली आंतरराष्‍ट्रीय ट्रिप थायलंडला होती. तेथे कामानिमित्त गेले होते. पण मी स्‍वत:हून या शहरामध्‍ये फेरफटका मारला. या ट्रिपचा अनुभव अत्‍यंत संस्‍मरणीय आहे. मी नेहमी माझ्या कुटुंबियांसोबत प्रवास केला आहे, पण या ट्रिपदरम्‍यान मी पहिल्‍यांदाच एकटीने प्रवास केला आणि तो देखील देशाबाहेर, म्‍हणूनच माझ्यासाठी ही ट्रिप अत्‍यंत खास होती. (World Tourism Day) मी या देशामधील नयनरम्‍य ठिकाणे व आकर्षक समुद्रकिनारे पाहिले आणि मला ते खूप आवडले. प्रादेशिक अस्‍सल थाय फूडचा आस्‍वाद घेऊ पाहणाऱ्या लोकांसाठी थायलंड परिपूर्ण फूड पॅराडाईज आहे. माझ्या बकेट लिस्‍टमध्‍ये भेट देण्‍यासाठी अनेक स्थळ आहेत आणि त्‍यामध्‍ये ग्रीस अव्‍वलस्‍थानी आहे. मी लवकरच ग्रीसला जाणार आहे.'' (World Tourism Day)

सोनी सबवरील मालिका 'अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल'मध्‍ये अलिबाबाची भूमिका साकारणारा शेहजान खान म्‍हणाला, ''महामारीपूर्वी माझे मित्र आणि मी मनालीला गेलो होतो. मी जवळपास ३ वर्षांनी कामामधून ब्रेक घेतला आणि खूप धमाल केली. थंड वातावरणामध्‍ये चालण्‍यापासून थंडगार पर्वतरांगांमध्‍ये बाइक राईड करण्‍यापर्यंत आम्‍हा सर्वांनी खूप धमाल केली. नुकतेच मी माझी नवीन मालिका 'अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल'च्‍या शूटिंगसाठी लेह लडाखला गेलो. कामानिमित्त येथे गेलो असताना देखील लडाखमधील ट्रिप सर्वोत्तम आठवण ठरली. मी आकाशातून १२ ते १५ तारे तुटताना पाहिले आणि त्यामधून मला जाणवले की, जीवनात जेथे मौजमजा करायची तेथे करू शकतात आणि मी तसे केले.

मला भारतातील सर्व नयनरम्‍य ठिकाणी जायचे आहे. अनेक लोक पर्यटनासाठी परदेशात जातात. पण माझ्या मते भारतात अजूनही पर्यटनासाठी न पाहिलेली अनेक स्‍थळे आहेत, जेथे जाऊन खूप धमाल करता येऊ शकते. मला समुद्रकिनारे खूप आवडतात, म्‍हणून मी अंदमान निकोबारमधील नील बेटावर जाणार आहे. मला तेथील जगप्रसिद्ध संध्‍याकाळ व सूर्यास्‍त पाहण्‍याचा आनंद घ्‍यायचा आहे.''

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news