Rupa Dutta : कोण आहे ही पाकिटमारी प्रकरणी अटक झालेली अभिनेत्री?

actress rupa dutta
actress rupa dutta
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री रूपा दत्ताला (Rupa Dutta) पोलिसांनी पाकिटमारच्य़ा आरोपाखाली अटक केलीय. रूपा दत्ता (Rupa Dutta) ही बंगाली चित्रपट इंडस्ट्रीची प्रसिध्द अभिनेत्री आहे. रुपा ही पहिल्यांदाच अशी प्रसिध्दीच्या झोतात आलेली नाही. ती याआधीही चर्चेत आली होती. ज्यावेळी तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

कोलकाता (kolkata) येथे पुस्तक मेळाव्यात पाकिटमारीच्या आरोपाखाली प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रुपा दत्ताला पोलिसांनी अटक केलीय. कोलकातामध्ये सुरू असलेल्या पुस्तक मेळाव्यात पोलिसांनी रुपाला कचऱ्यात बॅग फेकताना पाहिलं होतं. रुपाच्या बॅगमधून पोलिसांनी ७५ हजार रुपये हस्तगत केले आहेत.

२०२० मध्ये रूपा त्यावेळी चर्चेत आली, जेव्हा तिने बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तिने अश्लिल मेसेज पाठवण्याचाही आरोप केला होता. तिचं म्हणणं होतं की, अनुराग कश्यपने तिला फेसबुकवर अश्लिल मेसेज पाठवले होते.

इतकचं नाही तर रूपाने अनुराग कश्यपवर ड्रग घेतल्याचा आरोप केला होता. याचबरोबर तिने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील केली होती. तपासानंतर समजलं होतं की, रूपाला मेसेज पाठवणारा व्यक्ती अनुराग कश्यप नाही. तर कुणी दुसरा अनुराग होता. त्यामुळे रूपाने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे निघाले.

अनेक शोज आणि चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. तिने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट ठेवल्यामुळे तिच्या सोशल मीडिया अकाउंटमधून अधिक माहिती मिळत नाहीये.

तिचे इन्स्टा बायो पाहिले तर तिने टीव्ही शो 'जय मां वैष्णो देवी' मध्ये माता वैष्णो देवी ची भूमिका साकारलीय. याशिवाय तिने लेखिका, दिग्दर्शिका आणि सामाजिक कार्यकर्ती असा उल्लेख केला आहे. तिची एक ॲक्टिंग ॲकॅडमीदेखील आहे. तिने शूल फौंडेशनची सुरूवात केली होती आणि महिला सशक्तीकरणसाठी काम केले.

कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात पोलिसांनी रूपाला अनेक बॅग आणि ७५ हजार रुपयांसह अटक केली होती. पण, अशी कोणती वेळ आली की तिला चोरी करावी लागली, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news