सिंहगड किल्ल्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

सिंहगड किल्ल्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सिंहगड किल्ल्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने पाच ते सहा पर्यटक किरकोळ जखमी झाल्याने वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिहगडावरील कल्याण दरवाज्याजवळ ही घटना 12 जून ला दुपारी तीनच्या सुमारास घडली. सिंहगडावर हजारोंच्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी आले होते. या घटनेनंतर किल्ल्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित पणे खाली आणण्यात आले आहेत.

त्याच बरोबर जखमी पर्यटकांना रुग्णवाहिकेतून पुण्यातील रुग्णालयात पाठवून दिले आहे. सर्व पर्यटकांना कोंढणपूर फाट्यावर सुरक्षित आणण्यात आले असून परिस्थिती आटोक्यात आणल्याचे वन अधिकारी भाऊसाहेब लटके यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news