पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई अंडरवर्ल्डमध्ये 'बेबी क्वीन' (Baby Queen) म्हणून जिचा दबदबा होता, अशा शशिकला उर्फ बेबी पाटणकरच्या जीवनावर आधारित आगामी काळात वेब सीरिज येणार आहे. समीर वानखेडे व सिनेतारकांमुळे नार्कोटिक्स ब्युरोचा म्हणजेच एनसीबीचा जो गवगवा झाला, त्याचा ट्रॅक रेकाॅर्ड समजून घ्यायचा असेल तर बेबीच्या जीवनाबद्दल जाणून घ्यावं लागेल. पण, कोण ही बेबी पाटणकर? ती अंडरवर्ल्डमध्ये काय करायची? तिला 'नार्को क्वीन' का म्हणतात? हे सगळं आपण जाणून घेऊ…
ड्रग्ज प्रकरणात २०१५ मध्ये पहिल्यांदा बेबीला (Baby Queen) अटक करण्यात आली. पण, तिच्या अगोदर कित्येक पोलिसांना तुरुंगाची हवा खाण्यासाठी आतमध्ये पाठविण्यात आलं होतं. कित्येक पोलीस अधिकाऱ्यांची नोकरी गेली होती. प्रकरण जेव्हा उलगडलं तेव्हा प्रशासनालाच धक्का बसला. कारण, चक्क पोलीस ठाण्यातील लाॅकरमध्ये ड्रग्ज ठेवण्यात आले होते. धर्मा काळोखे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याचा लाॅकरमधून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
पोलीस धर्मा काळोखे हा बेबीचा चांगला मित्र होता, अशीही चर्चा होती. बेबीला अटक करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिक्षक अवधूत चव्हाण यांच्याकडे बेबीची संपूर्ण हिस्ट्री आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ,बेबी ही वरळी, कोळीवाडा येथे लहानाची मोठी झाली. बेबी ही आई आणि चार भावांसोबत राहत होती. बेबी जेव्हा ६ वर्षांची होती तेव्हा परिसरातील गुंड मारियाचा मर्डर झाला. त्याचा मर्डर आराेप बेबीच्या भावावर हाेता.
पोलिसांनी बेबीच्या (Baby Queen) तिघा भावांना अटक केली. त्यांना तुरुंगात पाठविण्यात आलं. घरात बेबी, तिचा एक भाव अर्जून आणि आई होती. मुलांच्या अटके मुले आईला जबर धक्का बसला होता. दोन महिन्यांतच आईचा मृत्यू झाला. बेबीचं वय तेव्हा अवघं ६ वर्षं होतं. अशा परिस्थितीत लोकांच्या घरची कामं करून स्वतःचा आणि अर्जुन सांभाळ करू लागली. अर्जुन गॅरेजमध्ये काम करू लागला.
१५ वर्षांच्या बेबीचं रमेश पाटणकर नावाच्या माणसाशी लग्न झालं. .तो कोळीवाड्यात राहत होता. तो दारूडा होता. त्यामुळे १९९१ मध्ये त्याचाही मृत्यू झाला. तेव्हा बेबीने एका मिलमध्ये काम करू लागली. ५ वर्षांना मिल बंद पडली. त्यानंतर बेबीने धुण्याभांड्याची कामं सुरू केली. याच दरम्यान तिच्या ३ भावांची तुरुंगातून सुटका झाली. ते घरी आले.
त्यानंतर बेबीच्या एका भावाने म्हणजे भरतने भारती नावाच्या मुलीशी लग्न केले. ते सिद्धार्थनगरमध्ये राहू लागले. भारतीचा भाऊ बल्लूदेखील त्यांच्यासोबत राहू लागला. त्यांच्याशेजारी बेबीदेखील राहू लागली. पण, बल्लू २४ तास ड्रग्जच्या नशेत राहत होता. अशा पद्धतीने बेबीचे जीवन सुरू होते. याच दरम्यान १९९६ मध्ये भरतच्या घरी चोरी झाली. पोलिसांची एक टीम त्यांच्या घरी पोहोचली. त्यात धर्मा काळोखे हा पोलीस कर्मचारी होता.
तिथेच बेबी आणि धर्मामध्ये मैत्री झाली. त्यांच्यात जवळीकता वाढली. त्याचा फायदा बल्लूने उठवला. बल्लूला असं वाटू लागलं की, आता निर्धास्तपणे आपण ड्रग्ज घेऊ शकतो. कारण, पोलीस धर्मा काळोखे आपल्या ओळखीचा आहे. हा बल्लू अयूबकडून ड्रग्ज घेत होता. हा अयूब आता हळूहळू बेबीच्या घरात ड्रग्ज ठेवू लागला. जेव्हा अयूब नसायचा तेव्हा बेबी ड्रग्ज विकायची. दरम्यान अयूबचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचं राहिलेलं ड्रग्ज बेबीजवळ होतं.
बेबीची ड्रग्ज विकण्याची सुरूवात इथनूच झाली. तिने अयूबचा शिल्लक राहिलेला माल विकलाच; पण बल्लूच्या आधाराने अयूब कुठून माल आणायचा याचाही पत्ता तिने लावला. त्यानंतर बेबी माल आणून वरळीमध्ये विकू लागली. वरळीमध्ये नार्कोटिक्स सेलचं युनिट आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली. त्यांनी तिच्याकडून हप्ता वसुली सुरू केली. पोलिसांना हप्ता देऊन बेबी आपला धंदा सांभाळू लागली.
ड्रग्जचा धंदा जोरात चालू लागला. धर्मा काळोखे तिच्याबरोबर होता. कित्येक वर्षं हा धंदा सुरू होता. ९ मार्च २०१५ मध्ये साताऱ्यातील पोलिसांना धर्मांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या, तेव्हा त्यांना तब्बल १० किलो ड्रग्ज मिळाले. तेव्हा धर्मा हा मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये तैनात होता. पोलिसांना तिथेही धाड टाकली तर १५ किलो ड्रग्ज सापडले. पोलिसांच्या लाॅकरमध्ये ड्रग्ज सापडल्यामुळे संपूर्ण देशात चर्चेला उधाण आलं. पण, याच वेळी बेबी पाटणकर गायब झाली होती.
पोलिसांनी तिला शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला. दरम्यान, बेबी एका लग्जरीमधून कराडमधून मुंबईला येत असताना पनवेलमध्ये तिला पोलिसांना अटक केली. तेव्हा तिने अनेक पोलिसांची नावं सांगितली. पोलिसांची मदत घेऊनच ड्रग्जचा धंदा वाढवला. त्याच्या जोरावर बेबीने मुंबई, पुणे, लोणावळा, कोकण या ठिकाणी आलिशान बंगले उभे केले.. तिच्याकडे २२ बॅंक अकाऊंट्स होते. त्यामध्ये जवळजवळ दीड करोड रुपयांची एफडी होती. काही दारुची दुकानंही तिने खरेदी केलेली होती. तिला गाड्यांचादेखील छंद होता. कित्येत आलिशान गाड्यादेखील तिच्याकडे होत्या. तिच्या गाड्या इन्कम टॅक डिपार्टमेंट आणि सरकारी विभागातदेखील वापरल्या जात होत्या.
हेही वाचलं का?