पुढारी ऑनलाईन डेस्क : (Baba Vanga) बाबा वंगा हे बल्गेरियाचे रहिवासी होते, त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. त्यांनी ११ ऑगस्ट १९९६ रोजी जगाचा निरोप घेतला. बाबा वंगा हे लहानपणापासूनच अंध होते. ते हर्बल औषधांचे जाणकार होते. त्यांनी केलेले अनेक अंदाज खरे ठरल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बाबा वंगा यांनी मृत्यूपूर्वी ५०७९ वर्षांची भविष्यवाणी केली होती. बाबा वंगा यांचे भाकीत अनेकदा चुकीचे सिद्ध झाले असले तरी त्यांचे अनेक मोठे दावे खरेही ठरले आहेत. त्यांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही अस अनेकांनी म्हटलं आहे.
असं म्हणतात की, बागा वंगा यांनी केलेले भाकीत कुठेही लिहिलेले नाही. हे सर्व त्यांनी आपल्या अनुयायांना तोंडी सांगितले होते. वंगा बाबा यांनी वर्ष २०२२ बाबतही अनेक भविष्यवाणी केली होती. यात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केल्याचे म्हटले आहे.
बाबा वंगा (Baba Vanga) यांनी २०२२ या वर्षाविषयी भविष्यवाणी केली होती. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियासह आशिया खंडातील देशात ज्यात भारतही आहे. या देशांत भूकंप आणि त्सुनामी सारख्या घटना घडणार आहेत. यात मोठे नुकसान होणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी केल्याचे सांगितले जाते.
बाबा वंगा (Baba Vanga) यांनी दुसरी भविष्यवाणी पाणी टंचाईवर केली आहे. २०२२ मध्ये मोठ्या शहरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. याचे कारण वाढती लोकसंख्या आणि वाढते प्रदूषण असेल असं त्यांनी म्हटलं होते.
२०२२ मध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा सगळ्यात जास्त परिणाम भारतावर होईल, तापमान वाढेल. त्यामुळे टोळांची संख्या वाढेल, यामुळे पिके खराब होतील आणि उपासमारीचा धोका वाढेल. अस भाकितही बाबा वंगा यांनी केले आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे सायबेरियात बर्फ वितळण्यास सुरुवात होईल आणि घातक व्हायरसचा जन्म होईल, अशी भविष्यवाणी बाबा वंगा (Baba Vanga) यांनी केली होती, असेही सांगण्यात आले आहे. हा विषाणू इतका धोकादायक असेल की जगातील सर्व व्यवस्था अयशस्वी ठरतील.
हेही वाचलत का?