भारतीय सीमेवर चीनचे ‘रोबो लष्कर’ तैनात | पुढारी

भारतीय सीमेवर चीनचे ‘रोबो लष्कर’ तैनात

ल्हासा/लेह ; वृत्तसंस्था : भारतीय लष्करातील जवानांसह लडाखमधील रक्‍त गोठविणार्‍या थंडीचा मुकाबला करण्याची वेळ आता चिनी सैनिकांवर येणार नाही. लडाखच्या थंडीत चिनी सैनिक कुचकामी ठरतात म्हणून चीनने आपले रोबो लष्कर तैनात केले आहे.

मानवविरहित वाहने सज्ज ठेवली आहेत. तिबेट आणि लडाखच्या सीमांवर डझनोगणती स्वयंचलित आणि रोबोटप्रमाणे कार्य करणारी वाहने चीनने तैनात केली आहेत. चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये नुकत्याच झालेल्या एका संघर्षात चिनी सैनिकांचे बळ थंडीत गळून पडते, असे प्रकर्षाने समोर आले होते. त्यामुळे चीनने हा मार्ग काढला आहे.

तिबेट सीमेवर चीनकडून 88 शार्प क्लॉ गाड्या तैनात केल्या आहेत, तर लडाख सीमेवर 38 शार्प क्लॉ गाड्या तैनात आहेत. तिबेट सीमेवर तैनात स्वयंचलित म्युले 200 (मानवरहित) वाहने 50 किमी अंतरापर्यंत हल्ला करण्यातही सक्षम आहेत.

तिबेटमध्ये सध्या 120 म्युले-200 तैनात असून, बहुतांश वाहने ही भारतीय सीमेलगत सज्ज आहेत. 200 लिंक्स ऑल-टेरेन वाहने तिबेटमध्ये, तर 150 लिंक्स ऑल-टेरेन वाहने लडाखलगत तैनात आहेत.

Back to top button