nikki tamboli : बिकिनी नव्हे तर हाफ शोल्डर ड्रेसवर टिकल्या सर्वाच्या नजरा
पुढारी ऑनलाईन : बिग बॉस १४ फेम निक्की तंबोली ( nikki tamboli ) तिच्या बोल्ड आणि बिकिनी लूकने नेहमी चर्चेत असते. सध्या तिच्या आणखी हॉट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.
नुकतेच निक्की तंबोली ( nikki tamboli ) ने आपल्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने पांढऱ्या आणि लाल रेषा असणाऱ्या हाफ शोल्डर टॉपसोबत डेनिम जीन्स घातली आहेया फोटोतील खास असे की, पहिल्यांदा तिच्या स्लीव्हज खांद्यावरून खाली सरकल्या असल्यासारखे दिसते असा चाहत्यांनी कयास लावला आहे. परंतु, नंतर तिने हाफ शोल्डर टॉप घातल्याचे समजते.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने सर्व चाहत्यांसाठी एक संदेश लिहिला आहे. यात तिने 'फॅशन फेड्स पण डेनिम कधीच नाही' असे लिहित प्रेमाचा ईमोजी शेअर केला आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने म्हटलं आहे, 'सुंदर आणि अप्रतिम दिसतेस'.
दुसऱ्या एकाने 'आम्हाला सहकार्य करा' असे लिहिले आहे. याशिवाय आणखी एकाने 'नक्की काही तरी बोल' असे लिहिले आहे. यासोबत काही चाहत्यानी हार्ट आणि फायरचा देखील ईमोजी शेअर केला आहे.
याआधी निक्की तांबोळीने काळ्या रंगाचा बॅकलेस गाऊन घालून फोटोशूट केले होते. यात तिने एका खुर्चीवर हटके पोझ दिली होती. त्यावेळचे निक्कीचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.
निक्की तांबोळी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे; पण तिला खऱ्या अर्थाने ओळख बिग बॉसच्या १४ व्या सीझनमधून मिळाली. बिग बॉसची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी ती शोमध्ये सेकंड रनरअप ठरली होती. याशिवाय निक्की नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट आणि बिकीनीतील फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
हेही वाचलंत का?

