अहमदाबाद : अयोध्येत रामलल्लाचा अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या चरण पादुकाही मंदिरात मांडण्यात येणार आहेत. पुढील वर्षात २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. श्रीरामाच्या चरण पादुका १ किलो सोने आणि ७ किलो चांदीपासून बनवलेल्या असून, सध्या त्या देशाटनावर आहेत. (Ayodhya Ram Mandir)
संबंधित बातम्या :
हैदराबादचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका बनवल्या आहेत. पादुका रविवारी रामेश्वर धामहून अहमदाबादेत आल्या. येथून त्या सोमनाथ ज्योतिर्लिंग धाम, नंतर द्वारकाधीशनगरी (द्वारका), पुढे बद्रीनाथ धामला नेल्या जातील. १९ जानेवारी रोजी या पादुका आयोध्येत येतील. श्रीचल श्रीनिवास यांनी या पादुका हातात घेऊन अयोध्येत निर्माणाधीन मंदिराची ४१ दिवस प्रदक्षिणा करून पादुकांच्या देशाटनाला सुरुवात झाली. (Ayodhya Ram Mandir)
चेन्नई : अयोध्येतील श्रीराम मंदिरात बसविल्या जाणाऱ्या घंटा नामक्कलमध्ये (तामिळनाडू) तयार होत असून, गेल्या महिन्याभरात इथे ४८ घंटा पूर्ण झाल्या. रामलल्लाच्या अभिषेकाच्या पार्श्वभूमीवर त्या अयोध्येकडे पाठविण्यात आल्या आहेत. अद्याप ७० किलो वजनाच्या ५ घंटा, ६० किलो वजनाच्या ६ घंटा आणि २५ किलोचा एक घंटा तयार होत आहे. एकूण १२ मोठ्या घंटा, तर ३६ लहान घंटा अजून तयार होत आहेत.
तांबा, चांदी आणि जस्ताचा वापर त्या बनविण्यासाठी होत आहे. राम मंदिरासाठी एकूण १०८ घंटा तयार केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात ४८ घंटा अयोध्येला पाठविण्यात आल्या आहेत. कर्नाटकच्या बंगळूरमधील एक भाविक राजेंद्र नायडू हे मंदिराला या घंटा अर्पण करत आहेत. नामक्कल येथील राजेंद्रन यांना त्यांनीच हे काम दिले. घंटा तयार करणे हा राजेंद्रन यांचा पिढीजात व्यवसाय आहे.