राममंदिर 23 जानेवारीपासून भाविकांसाठी खुले होणार | पुढारी

राममंदिर 23 जानेवारीपासून भाविकांसाठी खुले होणार

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येतील श्रीराम मंदिरात 23 जानेवारीपासूनच सर्वसामान्य भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. दि. 23 रोजी सर्वसामान्यांसाठी मंदिर खुले केले जाईल, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली.

ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांनी सांगितले, 22 रोजी मंदिराच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर संघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आणि सर्व विश्वस्त मंदिराच्या प्रांगणात उपस्थित असतील. पुढच्याच दिवशी मंदिर सर्वांसाठी खुले होईल. अचानक गर्दी उसळू नये म्हणून राज्यनिहाय परवानगीच्या तारखा वाटून देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

भाविकांसाठी खास विशेष टेंट सिटी उभारण्यात आली आहे. कडाक्याची थंडी लक्षात घेऊन एअरटाईट (हवाबंद) टेंटची ही व्यवस्था ऋषी-मुनी, संत तसेच भाविकांसाठी केली आहे. डॉक्टर, लहान व फिरती रुग्णालये, रुग्णवाहिन्या, 24 तास अन्नछत्र, दोन हजारांहून अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक प्रकारच्या पूर्वतयारीला 15 जानेवारीपर्यंत अंतिम स्वरूप प्राप्त झालेले असेल, असेही राय यांनी सांगितले.

Back to top button