Ram Mandir inauguration : रामलल्लांचे ‘दुसरे’ आगमनही परमवैभवी

Ram Mandir inauguration : रामलल्लांचे ‘दुसरे’ आगमनही परमवैभवी
Published on
Updated on

अयोध्या : वृत्तसंस्था : हनुमंत, सुग्रीव, बिभीषणासारख्या भक्तांच्या सहकार्याने मिळविलेल्या लंकादिग्विजयानंतर प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत परतले होते, तेव्हा आपल्यासह ते येथे वैभवाची दिवाळी घेऊन आले होते. दिवाळी तर पुढेही कायम राहिली; पण श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीतील त्यांचे स्वत:चे हक्काचे ठिकाण परकीय आक्रमणात उद्ध्वस्त झाले. याउपर वर्षानुवर्षे, शतकानुतके त्या-त्या पिढीतील रामभक्तांनी हे ठिकाण मर्यादा पुरुषोत्तमाला पूर्ववत मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू ठेवला. रामाप्रमाणेच भक्तही अखेर या लढाईत विजयी ठरले… आणि प्रभू श्रीराम त्यांच्या हक्काच्या ठिकाणी 'रामलल्ला' या बालस्वरूपात 22 जानेवारीला विराजमान होणार आहेत! त्यांचे हे आगमनही अयोध्येसाठी परमवैभवी ठरलेले आहे!! रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेच्या या ऐतिहासिक क्षणांचे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साक्ष ठरणार आहेत!!! (Ram Mandir inauguration)

संबंधित बातम्या :

अयोध्या तसे एक लहानसे शहर; पण रामभक्तांच्या दिग्विजयानंतर ते एका आंतरराष्ट्रीय महानगरात परिवर्तित होऊ घातलेले आहे. देशांतर्गत विमानसेवांसाठीचे विमानतळ शहरात दिमाखात उभे झाले आहे. लवकरच आंतराष्ट्रीय विमानतळाचे कामही सुरू होईल. केंद्र व राज्य सरकारच्या अर्थसाह्याने 50 हजार कोटी रुपयांहून जास्त खर्चाची विकासकामे अयोध्येत होत आहेत. अनेक लहान राज्यांच्या अर्थसंकल्पाहूनही ही रक्कम जास्त आहे. (Ram Mandir inauguration)

16 लाख रोजगार

येत्या काही दिवसांत अयोध्या परिसरातील 100 कि.मी.च्या परिघात 16 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. ताज, ओबेरॉयसह फाईव्ह स्टार, फोर स्टार अशा 42 हॉटेल-रिसॉर्टस् परवानगीसाठी पर्यटन विभागाकडे रांगेत आहेत. (Ram Mandir inauguration)

मुंबईतील बिल्डर्सचा अयोध्येत व्यवसाय

यूपीमध्ये जायलाही देशातील औद्योगिक घराणी पूर्वी बिचकत असत. आता खास अयोध्येसाठी खासगी गुंतवणुकीचे 45 हजार कोटींचे प्रस्ताव आलेले आहेत. अयोध्येत मुंबईतील ख्यातनाम बिल्डर्स ठाण मांडून आहेत. इमारती उभारत आहेत. मुंबईप्रमाणेच इथेही आता कोट्यवधींच्या सदनिका विकल्या जातील. देशातील पहिले एलिवेटेड कानकोर्स रेल्वे स्टेशनही अयोध्येत साकारले जात आहे. टाटा पॉवर या शहरात 110 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारत आहे. एखाद्या शहरात ही संख्या देशात सर्वाधिक आहे. (Ram Mandir inauguration)

जमिनींचे तब्बल 45 हजार सौदे

चार वर्षांत अयोध्येत जमिनीचे 45 हजार सौदे झाले आहेत. जी जमीन पूर्वी 1 हजार रुपये चौरस फूट भावात सहज उपलब्ध होत असे. ती आता 12 हजारांच्या दरातही मिळेनासी झाली आहे. चौदह कोसी परिक्रमेलगतची 1,350 चौरस फूट जमीन 4 लाखांवरून 65 लाखांना भिडली आहे. रिंग रोडलगतच्या जमिनींचे भाव 20 पटींनी वाढले आहेत.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ (1 हजार 362 कोटी)

विमानतळांसाठी 821 एकर जागा आरक्षित केली आहे. तीन वर्षांच्या आत देशांतर्गत सेवांसाठीचे विमानतळ विकसित करण्यात आले.
सद्यस्थिती : व्यावसायिक संचालन सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

रामपथ (850 कोटी) : शहादतगंज ते नया घाट 13 कि.मी. चा रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्ती. पुन्हा हा रस्ता लखनौ-अयोध्या-गोरखपूर महामार्गाला, राम मंदिर तसेच शरयू घाटापर्यंत नेणे. मंदिरासाठी आणखी 2 इतर रस्तेही आहेतच.
सद्यस्थिती : पूर्णत्वाच्या जवळपास.

निचरा व्यवस्था (245 कोटी) : 20 हजार नव्या इमारतींसाठी एकूण 133.5 कि.मी. ची निचरा व्यवस्था
सद्यस्थिती : काम अंतिम टप्प्यात आहे.

पार्किंग कॉम्प्लेक्सेस (155 कोटी) : प्रत्येकी 700 कार उभ्या केल्या जाऊ शकतील, अशा क्षमतेचे चार पार्किंग लॉटस्, दुकाने, लॉजिंग आणि पार्किंग अशा संयुक्त सोयीसुविधांनी युक्तअशी ही संकुले असतील.
सद्यस्थिती : 3 तयार आहेत. 4 अंतिम टप्प्यात आहेत.

रस्त्याची कामे (10 हजार कोटी) : अयोध्येअंतर्गत तसेच जिल्ह्यातील गावांशी व नजीकच्या जिल्ह्यांशी जोडण्याचे 'न्हाई'चे अनेकविध प्रकल्प
सद्यस्थिती : काहीच सुरू, बहुतांश प्रस्तावित

रिंग रोड (44 कोटी) : शरयू नदीला आणि तिला मिळणार्‍या नाल्यांना लागून गुप्तार घाट ते राजघाटदरम्यान 4.5 कि.मी. लांबी आणि 6 मीटर रुंदीच्या निसर्गरम्य रस्त्याची निर्मिती.
सद्यस्थिती : काम पूर्ण.

नवी टाऊनशिप (3 हजार कोटी) : लखनौ-गोरखपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रहिवासी, व्यावसायिक, बहुउपयोगी संकुले अशा नव्या टाऊनशिपची निर्मिती 1 हजार 407 एकरवर होईल.
सद्यस्थिती : पहिला टप्पा तयार होतोय. कमर्शिअल लाँचिंगची तयारी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवर आधारित प्रकल्प

मंदिर संग्रहालय (बजेट यायचे आहे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष सूचनेवर आधारित प्रकल्प. यात प्रसिद्ध भारतीय मंदिरांच्या प्रतिकृती असतील व या मंदिरांचा इतिहासही अधोरेखित असेल. (Ram Mandir inauguration)
सद्यस्थिती : शरयू नदीतटावर 50 एकर जागा त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.

टेंट सिटी : देशांतर्गत पर्यटकांसाठी रहिवासाची सुविधा असलेले अनेक परिसर, आलिशान तसेच परवडतील अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा.
सद्यस्थिती : 6 परिसरांच्या कामाच्या निविदा जारी झाल्या आहेत.

अयोध्या बाजार : शरयूतटावरील घाटांवर बाजार. शून्य कचरा निर्माण होईल, असे बाजाराचे नियोजन
सद्यस्थिती : कामाच्या निविदा जारी केल्या आहेत.

सूर्यकुंड (9.6 कोटी) : पौराणिक महत्त्व असलेला हा जलाशय. त्याचे सौंदर्यीकरण, दररोज सायंकाळी इथे लेझर लाईट शोचे सादरीकरण.
सद्यस्थिती : पूर्ण झाले आहे.

राम वारसा पथ (9.6 कोटी) : राम पथावर हेरिटेज कॉरिडॉर. येथे जवळपास 180 वर भिंतींवर रामायणावर आधारित चित्रे साकारली जातील. स्थानिक संस्कृती, स्थानिक उत्पादनांचे मार्केटिंग होईल.
सद्यस्थिती : तीन महिन्यांत पूर्ण करायचे आहे.

पंचवटी बेट : खासगी सहभागासह शरयू नदीत 'अर्थ गंगा' योजनेअंतर्गत दरवेळेस तात्पुरत्या स्वरूपात करावयाची एका बेटाची रचना.
सद्यस्थिती : निर्मळ गंगा अभियानाकडून परवानगी बाकी

संध्या सरोवर : रेस्टॉरंट, फूड स्टॉल, बोटिंग आदी सुविधा; मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय : रामायणातील व्यक्तिरेखांचे तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे.
सद्यस्थिती : पहिले काम सुरू, दुसर्‍याची कार्य निविदा

अयोध्या रेल्वे स्थानक (240 कोटी) : तीन टप्प्यांत प्रकल्प प्रस्तावित, संभाव्य गर्दी लक्षात घेता उड्डाण पूल तसेच अनेकविध लिफ्टस्च्या सुविधा धरून.
सद्यस्थिती : एका अर्थाने पूर्णच झालेले आहे; पण प्रकल्पात 550 कोटी रुपये खर्चाचे सहा रेल्वे ओव्हरब्रिज आणखी जोडले गेले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news