पुढारी ऑनलाईन डेस्क : जेम्स कॅमेरूनचा बहुचर्चित 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way of Water) चित्रपटाने धुवाँधार कमाई केली आहे. चित्रपटगृहात ओपनिंग डेला दमदार कमाई केली. शिवाय आठवड्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळाली. पण, तरीही आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता 'अवतार-२' (Avatar-2 Box Office collection) हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. (Avatar-2 Box Office collection)
१६ डिसेंबर रोजी देशभरात चित्रपटगृहात रिलीज झालेल्या 'अवतार-२'ने पहिल्या दिवशी तिकिट खिडकीवर दमदार सुरुवात केली. चित्रपटाचे कलेक्शन ४१ कोटींपर्यंत पोहोचलं. यासोबत 'अवतार-२' ची इंडियन बॉक्स ऑफिसवर सर्वांत दमदार ओपनिंग ठरली. 'अवतार-२'च्या आधी २०१९ मध्ये एव्हेंजर्स एंडगेमने ओपनिंग डेला सर्वात अधिक कमाई केली होती. त्यावेळी ५३.१० कोटींचं कलेक्शन केलं होतं.
'अवतार-२'ने आपल्या पहिल्या विकेंडवर १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. दमदार ओपनिंगनंतर 'अवतार-२'ने शनिवारी ४२ कोटींचं कलेक्शन केलं. रविवारी ४६ कोटी कमावले. सोमवारी कलेक्शन १८ कोटींवर पोहोचलं. पाचव्या दिवशी मंगळवारी कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळाली. सुरुवातीच्या आकड्यानुसार 'अवतार-२'ने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर जवळपास १६ कोटींचं नेट कलेक्शन केलं. त्यासोबतचं पाच दिवसांत 'अवतार-२'ने देशभरात जवळपास १६३.५० कोटींचं नेट कलेक्शन केलं.
अवतारचा पहिला पार्ट १८ डिसेंबर, २००९ रोजी रिलीज झाला होता. जगभरात या चित्रपटाचे कौतुक झाले होते. अवतारच्या पहिल्या पार्टने जवळपास २००० कोटींचा बिझनेस केला होता. आता हे पाहावं लागेल की, 'अवतार-२' हा चित्रपट किती हजार कोटींचं रेकॉर्ड करतो.
हेही वाचा :