वेल्हेत काँग्रेस, राष्ट्रवादीचा वर्चस्वाचा दावा | पुढारी

वेल्हेत काँग्रेस, राष्ट्रवादीचा वर्चस्वाचा दावा

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  वेल्हे तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्वाचा दावा केला आहे. मतदारांनी तरुणाईला साथ देत प्रस्थापितांना मोठा धक्का दिला. कोशीमघरच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश किसन कडू हे अवघ्या एक मताने विजयी झाले. शिरकोली सरपंचपदी काँग्रेसचे अमोल भीमराव पडवळ हे 8 मतांनी विजयी झाले. अनेक सरपंच, सदस्य दहा ते पन्नासपेक्षा कमी मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. पानशेत, तोरणा भागातील ग्रामपंचायतींचे निकाल धक्कादायक लागले. तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले.

वेल्हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी काँग्रेसने 15 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत यांनी राष्ट्रवादीने निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचे म्हटले आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीन व भाजपने दोन तर वंचित विकास आघाडीला एका सरपंचपदी यश मिळाले.  कोनीमघर सरपंचपदी रमेश कडू यांना 175 व विरोधी बापू कुंभारकर यांना 174 मते मिळाली. गोंडेखल सरपंचपदी नीलेश विठ्ठल कडू हे 132 मते मिळवून झाले. विरोधी आकाश दत्ता कडू यांना 82 मते मिळाली. टेकपोळे सरपंचपदी मंगल दिनकर बामगुडे या 176 मते मिळवून विजयी झाल्या. विरोधी रसिका मोरे यांना 122 मते मिळाली. कोंडगाव सरपंचपदी पूनम पांडुरंग दारवटकर या 373 मते मिळवून विजयी झाल्या. विरोधी उमेदवार भारती रमेश दारवटकर यांना 200 मते मिळाली. सोंडेमाथना सरपंचपदी सोपान दिनकर गायकवाड 166 मते मिळवून विजयी झाले. विरोधी रमेश किन्हाळे यांना 142 मते मिळाली.

सोंडेकारला सरपंचपदी युवराज बबन कारले हे 146 मते मिळवून विजयी झाले. विरोधी शंकर लक्ष्मण खोपडे यांना 138 मते मिळाली. शिरकोलीत सरपंचपदी अमोल भीमराव पडवळ हे 233 मते मिळवून विजयी झाले. विरोधी मारुती बाळू मरगळे यांना 215 मते मिळाली. हारपुड सरपंचपदी अंकुश दत्तू कुमकर हे 192 मते मिळवून विजयी झाले. विरोधी बापू भागू कुमकर यांना 110 मते मिळाली. वेल्हे खुर्दला सरपंचपदी प्रकाश मारुती जेधे हे 447 मते मिळवून विजयी झाले. विरोधी उमेदवार संदीप शिवाजीराव दिघे यांना 287 मते मिळाली. कोलंबीत सरपंचपदी शीतल कोडीतकर या 239 मते मिळवून विजयी झाल्या. विरोधी उमेदवार कविता गांडले यांना 211 मते मिळाली. बोरावळे सरपंचपदी सुषमा बापू शिंदे या 203 मते मिळवून विजयी झाल्या. विरोधी पूजा दत्तात्रय शिंदे यांना 153 मते मिळाली.
गुंजवणे सरपंचपदी लक्ष्मण मखाजी रसाळ हे 305 मते मिळवून विजयी झाले.

विरोधी दिलीप किसन कोंथबिरे यांना 87 मते मिळाली. केळद सरपंचपदी अश्विनी ऋषिकेश भावळेकर या 680 मते मिळवून विजयी झाल्या तर विरोधी सीताबाई निवृत्ती शिळीमकर यांना 257 मते मिळाली. मोसे बुद्रुक सरपंचपदी किसन बबन बावधने 91 मते मिळवून विजयी झाले. विरोधी प्रमोद पासलकर यांना 38 मते मिळाली. घिवशी सरपंचपदी बाळासाहेब धावू मरगळे हे 104 मते मिळवून विजयी झाले. विरोधी रमेश देवराम मरगळे यांना 74 व चंद्रकांत डोईफोडे यांना 59 मते मिळाली. वाजेघर बुद्रुक सरपंचपदी स्वाती संतोष काब्दुले 3332 मते मिळवून विजयी झाल्या. विरोधी पूनम सागर शिळीमकर यांना 253 मते मिळाली. सोंडेहिरोजी सरपंचपदी निवृत्ती एकनाथ जाधव हे 167 मते मिळवून विजयी झाले. विरोधी शंकर सरपाले यांना 157 मते मिळाली.

लव्ही बुद्रुक सरपंचपदी शंकर कृष्णा रेणुसे हे 375 मते मिळवून विजयी झाले. विरोधी योगेश दिनकर रेणुसे यांना 238 मते मिळाली. पाल बुद्रुक सरपंचपदी निता किरण खाटपे या 326 मते मिळवून विजयी झाल्या तर विरोधी आशा रामचंद्र करंजकर यांना 285 मते मिळाली. बालवड सरपंचपदी विशाल तुळशीराम पारठे 139 मते मिळवून विजयी झाले. तर विरोधी संतोष वामन पारठे यांना 104 मते मिळाली. चिरमोडी सरपंचपदी अलका विजय गिरंजे या 531 मते मिळवून विजयी झाल्या. विरोधी रुपाली मोहन यादव यांना 309 मते मिळाली. सोंडे सरपाले सरपंचपदी पूनम प्रकाश बढे या 298 मते मिळवून विजयी झाल्या तर विरोधी अर्चना मोहन गिंरजे यांना 184 मते मिळाली. धानेप सरपंचपदी राहुल सुरेश मळेकर 379 मते मिळवून विजयी झाले. विरोधी उमेदवार कैलास धिंडले यांना 323 , तानाजी भुरुक यांना 323 मते मिळाली.

Back to top button