शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला आणि शिवसेनेची खास परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमीच चर्चेतील विषय आणि कायम लक्षात राहणारा. यावर्षीचा दसरा मेळावा तसा चर्चेतील विषयच राहिला आहे. कारण शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले आहेत. एक दसरा मेळावा तो ठाकरे गटाचा शिवाजी पार्क, मुंबई येथे आणि दुसरा बीकेसी मैदान, बांद्रा, मुंबई येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचा झाला. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावे दोन झाले आहेत. या दोन्ही गटाच्या दसऱ्या मेळाव्याला अनेक दिग्गज लोकांनी आपली हजेरी लावली होती. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अनेक कलाकारांनी आपली उपस्थित लावली होती. यामध्ये अवधूत गुप्ते, (Avadhoot Gupte) स्वप्निल बांदोडकर, प्रसाद ओक, प्रविण तरडे, शरद पोंक्षे, नंदेश उमप होते. या मेळाव्यात गायक अवधूत गुप्ते यांनी शिवसेनेचं नवं गाणं गायलं होत. यावरुन चर्चा रंगू लागल्या. यावरुन अवधूतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन खुलासा केला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,