Meg Lanning : ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

Meg Lanning : ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार मेग लॅनिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी २० विश्वचषकानंतर ती मैदानात उतरली नव्हती. आता सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तिने वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. लॅनिंगने ऑस्ट्रेलियासाठी ६ कसोटी, १०३ वनडे आणि १३२ टी-२० सामने खेळले आहेत.

संबंधित बातम्या : 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल मेग लॅनिंग म्हणाली, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेणे कठीण होते, परंतु मला वाटते की आता माझ्यासाठी योग्य वेळ आहे. मी भाग्यावान आहे, १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा मी आनंद घेतला. परंतु मला माहित आहे की आता काहीतरी नवीन करण्यासाठी माझ्यासाठी ही योग्य वेळ आहे. मी जे काही मिळवले त्याचा मला अभिमान आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत शेअर केलेले क्षण जपेल. मला माझ्या आवडत्या खेळाला सर्वोच्च स्तरावर खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल मी माझे कुटुंब, माझे सहकारी, क्रिकेट व्हिक्टोरिया, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन यांचे आभार मानू इच्छितो, असेही ती म्हणाली.

मेग लॅनिंग ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तिने टी-२० फॉरमॅटमध्ये एकूण १०० मॅचेसचे नेतृत्व केले, त्यापैकी ७६ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले. याशिवाय लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ६९ सामने जिंकले आहेत.

लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ यंदाच्या टी २० विश्वचषकात चॅम्पियन ठरला. कर्णधारपदाच्या बाबतीत तिने भारताच्या महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले होते. लॅनिंगने टी-२० विश्वचषकातील २६ पैकी २१ सामने जिंकले होते. या कालावधीत तिच्या विजयाची टक्केवारी ८० टक्के होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपमध्ये ३० पैकी फक्त २० मॅच जिंकू शकली.

लॅनिंग फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळणार

मेग लॅनिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, ती फ्रँचायझी खेळत राहील. लॅनिंग ही महिला बिग बॅश लीडर आणि महिला प्रीमियर लीगची स्टार खेळाडू आहे. लॅनिंग ही भारतात होणाऱ्या WPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार आहे. तर महिला बिग बॅश लीगमध्ये लॅनिंग ही मेलबर्न स्टार्सची कर्णधार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news