पुढारी ऑनलाईन डेस्क : Sourav Ganguly Prediction : वर्ल्ड कप 2023 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेतील 39 सामन्यांनंतर कोणते तीन संघ उपांत्य फेरीत खेळणार यांचीही नावे समोर आली आहेत. चौथा संघ म्हणून न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान शर्यतीत कायम आहेत. दरम्यान, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठे वक्तव्य करत एक भविष्यवाणी केली आहे.
गांगुली म्हणाले की, 'मला आशा आहे की पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचेल. कारण भारत-पाकिस्तान सामना हा विश्वचषकातील सर्वात मोठा सामना असेल.' (Sourav Ganguly Prediction)
गांगुलींनी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचेही कौतुक केले. ते म्हणाले की, 'विराट कोहली हा महान खेळाडूंपैकी एक आहे. ईडन गार्डन्सवर त्याने खेळलेली 49वे वनडे शतली खेळी आनंद देऊन गेली. त्याने ही मजल आधीच गाठली असती पण तो गेल्या काही सामन्यांमध्ये हा पराक्रम गाजवण्यापासून थोडक्यात हुकला.' (Sourav Ganguly Prediction)
गांगुली यांच्या भविष्यवाणीनंतर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत कसा काय पोहचू शकेल याकडे सर्वांची नजर लागली आहे. या समीकरणात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांना त्यांचा पुढच्या सामना गमवावा लागेल. तर त्याचवेळी पाकिस्तानने पुढचा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यानंतर 10 गुणांसह बाबरचा संघ सहज उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
दुसरीकडे न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या संघांनी आपला पुढचा सामना जिंकल्यास पाकला इंग्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागणार आहे. हा विजय एवढा मोठा असला पाहिजे की त्यांनी पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला रनरेटच्या जोरावर मागे टाकले पाहिजे.