औरंगाबाद : पैठण तालुका पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

paithan panchayat samittee arkhan
paithan panchayat samittee arkhan
Published on
Updated on

पैठण (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुका पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. पैठण तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता पैठण तालुक्यातील २० पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

या सोडतीमध्ये तीन गण अनुसूचित जातीसाठी तर पाच गण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामध्ये विहामांडवा (सर्वसाधारण) कारकीन (महीला) लोहगाव बुद्रुक ( महीला) चा समावेश आहे.

ओबीसी प्रवर्गासाठी एकुण पाच गण आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामध्ये बालानगर (महिला), नवगाव (महिला), कडेठाण (बु.), (सर्वसाधारण पुरुष), एकतुनी (सर्वसाधारण पुरुष), पिपंळवाडी पिराची (महिला) आदीचा समावेश आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण १२ गण ठेवण्यात आले आहेत. ५० टक्के आरक्षणानुसार एकुण सहा गण आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये नांदर (महिला) पाचोड बुद्रुक (महिला), चितेगाव (महिला), चांगतपुरी (महिला), निलजगाव (महिला), आडुळ बुद्रुक (महिला), चितेगाव (पुरुष), दावरवाडी (पुरुष), ढोरकीन (पुरुष), मुधलवाडी (पुरुष), राजंनगाव खुरी (पुरुष), बिडकीन (पुरुष), केकतजळगाव (पुरुष) आदी गावांचा समावेश आहे.

यावेळी पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी काळुराम बागुल, नायब तहसीलदार विष्णु घुगे, अमोल पाखरे, जाधव आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news