AsianParaGames : भारताने १६ व्या सुवर्णपदकावर कोरले नाव! सचिनची ‘शॉट पुट’मध्ये सुवर्ण कामगिरी

AsianParaGames : भारताने १६ व्या सुवर्णपदकावर कोरले नाव! सचिनची ‘शॉट पुट’मध्ये सुवर्ण कामगिरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये आज (दि.२६) चौथ्या दिवशीही भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. पुरुषांच्या शॉटपुट F46 मध्ये सचिन सर्जेराव खिलारी याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या पदकासह भारताने १५ सुवर्णपदकांचा पूर्वीचा विक्रम मोडला असून या स्पर्धेतील त्याचे १६ वे सुवर्ण पदक आहे.

बुधवारी आशियाई पॅरा गेम्सच्या तिसर्‍या दिवशी भारताची पदकतालिका ६४ (१५ सुवर्ण, २० रौप्य, २९ कांस्य) वर पोहोचली, हा सर्वात यशस्वी दिवस होता, जिथे सर्व सहा सुवर्णांसह ३० पदकांपैकी १७ पदके ऍथलेटिक्समधून आली.

संबंधित बातम्या :

पॅरा गेम्समध्ये डबल धमाका

आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या १०० मीटर T-३५ स्पर्धेत नारायण ठाकूर याने आज आणखी एक कांस्यपदक जिंकले. त्याने या स्पर्धेत १४.३७ सेकंदाची वेळ नोंदवली. नारायण ठाकूर याचे पॅरा गेम्समधील हे दुसरे पदक आहे. याआधी त्याने पुरुषांच्या २०० मीटर T-३५ मध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. तसेच भारताच्या श्रेयांश त्रिवेदी यानेही आज दुसरे पदक जिंकले. त्याने पुरुषांच्या 100 मीटर T-37 फायनल स्पर्धेत १२.२४ सेकंद वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले.

निमिषा सुरेशची 'सुवर्णउडी'

निमिषा सुरेश हिने महिलांच्या T47 लांब उडी स्पर्धेत ५.१५ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह बुधवारी सुवर्णपदक जिंकले. भारताचे हे १५ वे सुवर्णपदक ठरले. याच स्पर्धेत कीर्ती चौहानने ४.४२ मीटर वैयक्तिक सर्वोत्तम उडी मारून चौथे स्थान पटकावले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news