Goa National Games : क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन

Goa National Games : क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन
Published on
Updated on

पणजी, पुढारी वृत्तसेवा : Goa National Games : गोव्यात आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला 19 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर आज (दि. 25) बुधवारी कांपाल येथे उभारण्यात आलेल्या क्रीडानगरीत वेटलिफ्टिंग स्पर्धेला प्रारंभ झाला. विविध वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राची अनन्या पाटील हिने 77 किलो वजन उचलून दमदार सलामी दिली. त्यानंतर पं. बंगालची शबाना दास, हरियाणाची उषा एस व मणिपूरची फामो देवी यांनीही जोरदार प्रदर्शन केले.

कांपाल पणजी येथे उभारलेल्या या भव्य क्रीडानगरीसाठी तीन भव्य तंबू उभारण्यात आले असून वातानुकूलित अशा या तंबूमध्ये वेटलिफ्टिंग, वुशू, ज्युडो, योगासने, मल्लखांब, कुस्ती व लगोरी या स्पर्धा होणार आहेत. आज वेटलिफ्टिंग स्पर्धा सुरू झाली. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले. दुसर्‍या सत्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पर्धेला उपस्थित राहून विजेत्यांना पदके प्रदान केली.

कांपाल येथील क्रीडानगरी चांगल्या प्रकारे सजवण्यात आली असून रात्रीच्यावेळी परिसरात केलेल्या विद्युत रोशणाईमुळे ती जास्तच आकर्षक दिसत आहे. स्पर्धेला स्पर्धकांसोबतच त्या-त्या राज्यांचे क्रीडा अधिकारी, संघ व्यवस्थापक उपस्थित आहेत. आपापल्या राज्याच्या संघांना समर्थन देण्यासाठी चाहतेही गोव्यात दाखल झाले असून त्यामुळे खेळाडूंना जोरदार प्रोत्साहन मिळत आहे.

हॅण्डबॉलसंदर्भात संभ्रम

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 43 ऐवजी 42 खेळ असतील यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. स्पर्धा तांत्रिक आचार समितीने (जीटीसीसी) व्हॉलिबॉल-बीच व्हॉलिबॉल खेळाला स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकातून वगळले आहे. हॅण्डबॉलसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या खेळाबाबतही संभ्रम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news