Bas de Leede : बास डी लीडेचा वन-डेच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल; ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धू-धू धुतले | पुढारी

Bas de Leede : बास डी लीडेचा वन-डेच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल; ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धू-धू धुतले

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज विश्वचषकात नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँडवर ३०९ धावांनी सर्वांत मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नेदरलँडसमोर ४०० धावांचे आव्हान ठेवले होते. प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी ३९९ धावा केल्या. यावेळी नेदरलँडच्या गोलंदाजांना धू-धू धुतले. नेदरलँडचा गोलंदाज बास डी लीडेच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने १० षटकांच्या स्पेलमध्ये ११५ धावा दिल्या. त्याच्या या खराब गोलंदाजीमुळे तो वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. (Bas de Leede)

मॅक्सवेलचे सर्वात जलद शतक

स्फोटक फलंदाज मॅक्सवेलने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक वेगावान शतक (40 चेंडू) ठोकले. त्याने 240.91 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि फक्त 44 चेंडूत 106 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याचे हे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक आहे.

मॅक्सवेलचे विक्रम

मॅक्सवेल (138) वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. आता फक्त रिकी पाँटिंग (159) आणि अॅडम गिलख्रिस्ट (148) त्याच्या पुढे आहेत. याशिवाय मॅक्सवेलने पॅट कमिन्ससह वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सातव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा (103) विक्रमही केला. या दोघांनी स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन कुल्टर-नाईल (102 विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019) यांचा विक्रम मोडला. (Bas de Leede)

वॉर्नरचे सलग दुसरे शतक

नेदरलँड्सच्या अननुभवी गोलंदाजांची धुलाई करत वॉर्नरने शानदार खेळी केली. या सामन्यात त्याने 111.83 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 93 चेंडूत 104 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 22 वे शतक ठरले. तर या विश्वचषकातील त्याचे हे सलग दुसरे शतक ठरले. गेल्या सामन्यात त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध शतक झळकावले होते. (Bas de Leede)

हेही वाचलंत का?

Back to top button