पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पल्लीकल कार्तिक आणि हरिंदर पाल संधू यांनी आज (दि.४) हाँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत हाँगकाँगच्या का यी ली आणि ची हिम वोंग यांचा पराभव करून मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे स्क्वॅशमध्ये भारतासाठी आणखी एक पदक पदक निश्चित झाले आहे. भारतीय जोडीने 38 मिनिटांत 7-11, 11-7, 11-9 अशी तिन्ही गेममध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.
संबंधित बातम्या :
सुरुवातीच्या गेममध्ये भारत 5-8 ने पिछाडीवर होता, नंतर प्रतिस्पर्ध्यांना बरोबरीत रोखले होते. तरीही हाँगकाँगने सुरुवातीचा गेम जिंकला. पुढील दोन गेमसाठी हरिंदर आणि दीपिका यांनी जोरदार झुंज दिली. शेवटचा गेम ९-९ असा बरोबरीत सुटला आणि संधूने पुढील दोन गुण जिंकल्याने त्यासह भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवले.
दरम्यान, अनाहत सिंग आणि अभय सिंग ही भारताची दुसरी मिश्र दुहेरी जोडी आज दुसऱ्या उपांत्य फेरीत खेळणार आहे. भारताने यापूर्वी पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि महिला संघाने कांस्यपदक जिंकले आहे.
हेही वाचा :