पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप स्पर्धेत २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने असणार आहेत. या महामुकाबल्याकडे जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. त्यामुळेच दोन्ही संघाच्या भक्कम आणि कमकुवत बाजूंची चर्चा सुरु झाली आहे. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासीम आक्रम याने पाकिस्तानच्या संघाची कमकुवत बाजू कोणती, या प्रश्नावर भाष्य केले आहे.
वासीम आक्रम म्हणाला की, टी-२० संघात शाहिन आफ्रिदी हा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. हा वेगवान डावखुरा गोलंदाज पाकिस्तानसाठी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करत आला आहे. मात्र दुखापतग्रस्त असल्याने शाहिन हा आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजीमध्ये विविधता दिसणार नाही. ही संघाची कमकुवत बाजू असेल. शाहिन आफ्रिदीच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने मोहम्मद हसैन याला संधी दिली आहे.
शाहिन आफ्रिदी हा नवा चेंडू घेवून मैदानात उतरला की कोणत्याही संघाच्या सलामीवीरांसाठी डोकेदुखी ठरु शकतो. तो अचूक मारा करत फलंदाजांना जखडून ठेवताे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आशिया चषक स्पर्धेला मुकणार आहे. तो आताचा जगातील एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे. तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजीत विविधताच दिसणार नाही. याचा मोठा फटका पाकिस्तानच्या संघाला बसेल, असे भाकितही आक्रम याने वर्तवले आहे.
हेही वाचा :