Aryan Khan : आर्यन खानला ‘या’ कारणासाठी घरात शर्टलेस राहण्‍यास बंदी

shahrukh khan and Aryan Khan
shahrukh khan and Aryan Khan

मुंबई ; पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा Aryan Khan हा ड्रग्‍ज प्रकरणात अटकेत आहे.  मुंबईहून गोव्याला जात असलेल्‍या क्रूजवर होत असलेल्‍या रेव्‍ह पार्टीप्रकरणी आर्यन खानसोबत अन्य काही जणांना पोलिसांना ताब्‍यात घेतले होते. तो अन्य आरोपींसोबत जेल मध्ये बंद आहे. याच दरम्‍यान शाहरूखचा एक जुना मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्‍यामध्ये शाहरुख खान हा मुलगा आर्यनला घरातही शर्ट काढून (शर्टलेस) फिरण्यावर  बंदी घालत आहे. हा नियम स्‍वत: शाहरूखने आर्यनसाठी बनवला होता.

  • या मुलाखतीमध्‍ये शाहरूख खान याने आपल्‍या मुलांवर किती जीव आहे हे  सांगितले हाेते. मात्र त्‍याने आपल्‍या मुलांसाठी काही नियमही बनवले होते. आर्यन खानसाठी देखील वडील शाहरूख खानने काही नियम बनवले होते. यामध्ये आर्यन घरात कधीच शर्टलेस राहणार नाहीत. लहानपणापासूनच आर्यन या नियमाचे पालन करत आहे.
  • कोरोना मृतांच्या कुटुंबाला दरमहा ५ हजार मदत ; 'या' राज्याने घेतला निर्णय

एका जुन्या मुलाखतीमध्ये शाहरूखने या नियमाबद्दल माहिती दिली होती. शाहरूखच्या मते एका पुरुषाने आपल्‍या महिला नातेवाईकांसमोर शर्टलेस असताना फिरणे योग्‍य नाही. तो  नेहमीच आर्यनला घरातही शर्ट घालून फिरण्याचा सल्‍ला देतो.

मला वाटते घरामध्ये एखाद्या पुरूषाने विना शर्ट  फिरणे अयोग्‍य आहे. आई, बहिण किंवा नातेवाईकांसमोर तर शर्टलेस राहणे योग्‍य नाही. त्‍यामुळे मी आर्यनला नेहमी शर्ट घालण्याचा सल्‍ला देतो, असे शाहरुखने या मुलाखतीमध्‍ये म्‍हटलं हाेत.

शाहरूखने पुढे म्‍हटलय की, काय आई, बहिण, महिला नातेवाईक किंवा दोस्‍त बिनकपड्याचे तुमच्या समोर फिरेल का? जर ते असे करू शकत नसतील तर मग त्‍यांना तुमचे विनाशर्ट कसे आवडेल? असा सवालही शाहरुखने या मुलाखतीवेळी केला हाेता.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news